बांगलादेशातील सत्तांतरानंतर तिथल्या हिंदूंना आजही मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे. तिथल्या हिंदू महिलांवर उघडपणे अत्याचार केले जात आहे. त्यात नव्याने स्थापन झालेले युनूस सरकार याबाबत कोणतीही कठोर भुमिका घेत नाही. यामध्ये बांगलादेशातील बारावीत शिकणाऱ्या हिंदू तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भावनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
( हेही वाचा : Assembly Election 2024 : मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य)
बांगलादेशी हिंदू तरुणी पत्रात लिहते की, बांगलादेशातील घडणारी अत्यंत वाईट घटना म्हणजे हिंदूवर होणारे हल्ले. आम्ही खूप भितीदायक वातावरणात जगत आहोत. ज्याचे वर्णन शब्दात करता येणे अशक्य आहे. बांगलादेशात हिंदू महिलांवर आणि मुलींवर अगणित अत्याचार केले जात आहेत. तसेच हिंदू व्यावसायिकांची लूटमार करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असे बांगलादेशी हिंदू तरुणीने पत्रात लिहले. (PM Narendra Modi)
तसेच हिंदू तरुणीने पंतप्रधानांना विनंती करत, बांगलादेशातील हिंदूसाठी काहीतरी करण्याची तसेच मदत करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर हिंदू तरूणी म्हणाली, बांगलादेशातील सर्व हिंदूंच्या वतीने मी तुम्हाला विनंती करते की कृपया लवकरात लवकर आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सध्या आमच्यासाठी जे काही करत आहात त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. तसेच मला भारतातील लोकांचे आमच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छिते. परमेश्वरा वाचव आम्हाला…”(PM Narendra Modi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community