- विशेष प्रतिनिधी, मुंबई
माहीम विधानसभा क्षेत्रातून मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याठिकाणी उबाठा शिवसेनेच्या वतीने महेश सावंत आणि शिवसेनेकडून सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर झाली. परंतु, ही अमित ठाकरे यांच्या साठी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांना पक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाईल. जर या दोघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले तरी सावंत आणि सदा सरवणकर हे फायद्यातच राहणार आहे, शक्यता वर्तवली जात आहे. (Mahim Assembly Constituency)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध)
माहीम विधानसभेतून अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघात मनसे, शिवसेना आणि उबाठा शिवसेना यांच्यातच प्रमुख लढत होणार असून अमित राज ठाकरे हे स्वतः निवडणूक रिंगणात उतरल्याने ही लढत एकतर्फी होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या ४ तारखेला उमेदवारी अर्ज हे शिवसेना आणि उबाठा शिवसेना पक्षाकडून मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना आपले अर्ज घेण्यास पक्षाने भाग पाडल्यास शिवसेनेचे सदा सरवणकर आणि महेश सावंत हे फायद्यात असल्याचे बोलले जात आहे. (Mahim Assembly Constituency)
(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकरांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या Manjiri Marathe यांचा ‘समाजभूषण पुरस्कारा’ने गौरव)
सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले तर त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर केले जाऊ शकतात, किंवा त्यांना महा मंडल दिले जाऊ शकते तसेच आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया सरवणकर यांच्यासाठी दोन प्रभाग सोडले जावू शकतात. त्यामुळे निवडणुकीत उभे राहण्यापेक्षा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा विजय सुकर करण्यात हातभार लावता येईल. तसेच उबाठा शिवसेनेने महेश सावंत यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले तर पक्षाला त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर करावे लगणार आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घेऊन त्यांचा विजय सुकर होईल, पण दोन्ही उमेदवारांना विधान परिषदेची लॉटरी लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Mahim Assembly Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community