Maharashtra Assembly Election : भाजपाचे दोन माजी खासदार राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात

संजयकाका पाटील, प्रतापराव चिखलीकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

78
Maharashtra Assembly Election : भाजपाचे दोन माजी खासदार राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात
  • प्रतिनिधी

भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील, प्रतापराव पाटील-चिखलीकर तसेच सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोंबर) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून पाटील यांना तासगाव-कवठेमहंकाळ तसेच चिखलीकर यांना लोहा-कंधार तर निशिकांत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपाचे दोन माजी खासदार राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसणार आहेत. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – बांगलादेशी हिंदू तरुणीचे PM Narendra Modi यांना भावनिक पत्र; म्हणाली, बांगलादेशातील हिंदू…)

संजयकाका पाटील हे सांगलीचे माजी खासदार आहेत. लोकसभा निवडणूक झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा त्यांनी आमदारकीसाठी दंड थोपटले असून तासगाव-कवठेमंहकाळ मतदारसंघातून ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याकडे असल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघात शरद पवार पक्षाचे रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील अशी लक्षवेधी लढत होणार आहे. नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही लोहा-कंधार मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. चिखलीकर यांनी या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चिखलीकर यांनी लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मनसेची ४ थी यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी)

माऊली कटके यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेना (उबाठा) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून कटके यांना शिरुर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिरुरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार विरुद्ध माऊली कटके यांच्यात तगडी लढत पहायला मिळणार आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.