Air Travel चा घ्‍या आनंद, स्‍मार्टपणे भरा देय; व्हिसा सांगत आहे फ्लाइट्सवर सर्वोत्तम डिल्‍सचा आनंद घेण्‍यासाठी स्मार्ट टिप्‍स

121
Air Travel चा घ्‍या आनंद, स्‍मार्टपणे भरा देय; व्हिसा सांगत आहे फ्लाइट्सवर सर्वोत्तम डिल्‍सचा आनंद घेण्‍यासाठी स्मार्ट टिप्‍स

सणासुदीच्‍या काळाला उत्‍साहात सुरूवात झाली आहे आणि पर्यटक दिवाळी गेटवेजपासून वर्षाखेर सुट्ट्यांपर्यंत पुढील साहसी प्रवासासाठी विमानाने प्रवास करण्‍यास सज्‍ज आहेत. खिशावर अधिक भार न देता प्रवासाचा आनंद घेण्‍यासाठी खाली काही स्‍मार्ट टिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या यंदाच्‍या सीझनमध्‍ये तुम्‍हाला मोठी बचत करण्‍यास मदत करू शकतात. (Air Travel)

1. प्राइस अलर्ट्स सेट करा आणि लवकर बुकिंग करा :

विमानप्रवास दरांमध्‍ये होणाऱ्या बदलांवर देखरेख ठेवण्‍यासाठी तुमच्‍या इच्छित फ्लाइट्सकरिता प्राइस अलर्ट्स सेट करा. तुम्‍हाला अधिक पर्याय मिळू शकतात, तसेच तुम्‍ही सर्वोत्तम डिल्‍स सुनिश्चित करू शकता आणि सुट्टीच्‍या कालावधीपूर्वी दरांमध्‍ये होणारी वाढ टाळू शकता. (Air Travel)

(हेही वाचा – बांगलादेशी हिंदू तरुणीचे PM Narendra Modi यांना भावनिक पत्र; म्हणाली, बांगलादेशातील हिंदू…)

2. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्सचा फायदा घ्‍या :

तुमचे क्रेडिट कार्ड बहुमूल्‍य प्रवास सोबती आहे. व्हिसा नेटवर्कवरील अनेक को-ब्रॅण्‍डेड कार्ड्स सूट किंवा मोफत अपग्रेड्स, तसेच पॉइण्‍ट्स किंवा माइल्‍स असे अनेक लाभ देतात. या लाभांचा फायदा घ्‍या आणि उत्‍साहात प्रवासाचा आनंद घेत भावी ट्रिप्‍ससाठी पैशांची बचत करा. (Air Travel)

3. नो-कॉस्‍ट ईएमआय पर्यायांचा विचार करा :

फ्लाइट बुकिंगसाठी नो-कॉस्‍ट ईएमआय पर्याय तुम्‍हाला आटोपशीर, व्‍याज-मुक्‍त हप्‍त्‍यांमध्‍ये पेमेंट्स करण्‍याची सुविधा देतात आणि हप्‍ता देखील तुम्‍हाला परवडणारा असतो. (Air Travel)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मनसेची ४ थी यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी)

4. कनेक्‍टींग फ्लाइट्सचा अवलंब करा :

लांबच्‍या अंतराच्‍या प्रवासाकरिता संभाव्‍य कमी दरांसाठी थेट फ्लाइट्सऐवजी कनेक्‍टींग फ्लाइट्सची निवड करा, ज्‍यामुळे तुम्‍हाला बजेटचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करता येईल. काळजीपूर्वक प्रवास गंतव्‍याचे मूल्‍यांकन करा आणि तुमचे वेळापत्रक व बजेटला साजेशा कनेक्‍टींग फ्लाइट्सची निवड करा. (Air Travel)

5. उच्‍च कन्‍वर्जन दर टाळा :

आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी कमी कन्‍वर्जन दर देणारे मल्‍टी-करण्‍सी फोरेक्‍स कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्सचा वापर करा. या लहान समायोजनामुळे तुम्‍हाला मोठ्या प्रमाणात बचत करण्‍यास मदत होईल, ज्‍यामुळे तुम्‍ही प्रवासादरम्‍यान धमाल अनुभवांवर अधिक खर्च करू शकाल. या उपयुक्‍त टिप्‍ससह तुम्‍ही यंदा सणासुदीच्‍या काळात बजेट व धमाल अनुभवांबाबत तडजोड न करता आत्‍मविश्‍वासाने प्रवास करू शकता. (Air Travel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.