Sameer Bhujbal यांच्या बंडखोरीवर छगन भुजबळांचे टीकास्त्र; म्हणाले, सगळ्या पुतण्यांचे डीएनए…

100
छगन भुजबळ यांनी नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्यावर टीका केली. राजकारणातील सर्वच पुतण्यांचे डीएनए सारखेच आहेत, असे म्हटले.
समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. या ठिकाणी महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे समीर यांच्या कृतीमागे छगन भुजबळ यांचा हात असल्याचाही आरोप केला जात आहे. पण भुजबळ यांनी शुक्रवारी हा आरोप फेटाळला. तसेच राजकारणात सक्रिय असणाऱ्या पुतण्यांचा उल्लेख करत या सर्वांचा डीएनए एकच असल्याचा दावा करत समीर यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवार यांचा पुतण्या, अजित पवारांचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या अशी अनेक पुतणे कंपनी आहे. हे सर्वच जण काकांचे ऐकतात असे वाटत नाही. त्यामुळे राजकारणातील सर्वच पुतण्यांचा एक वेगळाच डीएनए आहे. समीर भुजबळ (Sameer Bhujbal)  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना पाठवलेल्या आपल्या राजीनामापत्रात म्हणाले की, आदरणीय दादा, साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्द केली होती. ही जबाबदारी पार पाडताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्षापासून बूथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.