विधानसभा निवडणुकीत मविआतील जागा वाटपाचा घोळ काही संपता संपेना. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उबाठा या तीन पक्षांमध्येच जागा वाटपाचा वाद सुटत नसताना आता मविआमधील छोटे पक्षही आता नाराज होऊ लागले आहेत. समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) ५ जागा मागितल्या आहेत, जर तेवढ्या जागा दिल्या नाही तर २५ जागा आम्ही लढवू, असा इशारा दिला.
महाविकास आघाडीकडून मित्रपक्षांना किती जागा मिळणार हेही स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे. तसेच महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे, असे समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) महाराष्ट्रातील नेते अबू आझमी यांनी केले आहे. उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले नाही, तर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिला आहे.
(हेही वाचा Sameer Bhujbal यांच्या भुजबळांच्या बंडखोरीवर छगन भुजबळांचे टीकास्त्र; म्हणाले, सगळ्या पुतण्यांचे डीएनए…)
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, शरद पवार यंच्यापेक्षा मोठा नेता महाविकास आघाडीमध्ये आहे, असे मला वाटत नाही. शरद पवारच आहेत ज्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. मी केवळ त्यांच्याकडे एवढेच सांगण्यासाठी आलो होतो की, मी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तुम्ही उत्तर देत असाल तर ठीक आहे नाहीतर माझ्याकडे २५ उमेदवार तयार आहे, असे आझमी म्हणाले.
Join Our WhatsApp Community