Maharashtra Weather : मुंबईत थंडीची चाहूल कधी? जाणुन घ्या महाराष्ट्राच्या हवामानातील बदलाविषयी

165
Maharashtra Weather : मुंबईत थंडीची चाहूल कधी? जाणुन घ्या महाराष्ट्राच्या हवामानातील बदलाविषयी
Maharashtra Weather : मुंबईत थंडीची चाहूल कधी? जाणुन घ्या महाराष्ट्राच्या हवामानातील बदलाविषयी

दाना चक्रीवादळामुळे (Maharashtra Weather) वातावरणात अनेक बदल होत आहेत. पावसाने जराशी उसंत घेतली आहे. दिवसभर उष्णता वाढत असली तरी सकाळी आणि रात्री उशिरा हवेत थोडा गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे. धुक्यामुळे सेंट्रल मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. (Maharashtra Weather)

(हेही वाचा-Mega Block : रविवारी ‘या’ मार्गांवर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या दिवाळीत एकिकडे गुलाबी थंडी चाहूल देताना दिसली तरीही काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तर, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यानं तापमानाच वाढ झाल्याचं जाणवणार आहे. एकंदरच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात दरम्यानच्या काळात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)

(हेही वाचा-BMC: महापालिकेच्या सेवेत लवकरच सात सहायक आयुक्त, एमपीएससीने जाहीर केला निकाल )

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी घट होणार असून, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधूनही पावसानं केव्हाचीच माघार घेतली असून, आता तापमानत घट होण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींनी आता वेग धारण करण्यास सुरुवात केल्यामुळं हवेत गारठा जणवू लागला आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.