Assembly Election 2024 : महापालिका शिक्षणाधिकारी निवडणूक रिंगणात; उबाठा शिवसेनेकडून ‘या’ मतदारसंघातून लढणार

966
Assembly Election 2024 : महापालिका शिक्षणाधिकारी निवडणूक रिंगणात; उबाठा शिवसेनेकडून 'या' मतदारसंघातून लढणार
  • सचिन धानजी

उबाठा शिवसेनेची दुसरी यादी शनिवारी मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून प्रसिद्ध करण्यात आली. या दुसऱ्या यादी मधून चोपडा विधानसभेतून राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राजू तडवी हे मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उमेदवारी अर्ज जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या शिक्षणाधिकारी पदाच्या राजीनामा हा मंजुरीसाठी पाठवला आहे. चोपडा विधानसभेसाठी राजू तडवी यापूर्वीपासूनच इच्छुक होते. आणि ते स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या तयारीत होते. त्यातच उमेदवारी जाहीर होतात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंजुरीसाठी पाठवला आहे. ही मंजुरी प्राप्त झाल्यानंतर तडवी हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेतही ‘या’ ५ ठिकाणी काँग्रेस सांगली पॅटर्न राबवणार; मैत्रीपूर्ण लढत होणार?)

मुंबई महापालिकेचे उपशिक्षणाधिकारी तसेच प्रभारी म्हणून कार्यरत असणारे राजू तडवी यांच्याकडे आता शिक्षण अधिकारी (माध्यमिक शाळा) या विभागाची जबाबदारी असून मागील अनेक महिन्यांपासून ते स्वेच्छा निवृत्तीच्या विचारात होते. त्यातच उबाठा शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत चोपडा विधानसभा मतदारसंघातून त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून मागील दोन वेळा शिवसेनेचे आणि त्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार जिंकून येत आमदार बनले होते. (Assembly Election 2024)

New Project 2024 10 26T132942.181

(हेही वाचा – Aadhar Card ला ‘जन्म तारखेचा’ पुरावा मानण्यास Supreme Court चा नकार; ‘हा’ वैध दस्तऐवज मानला जाणार)

हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येत असल्याने उबाठा शिवसेनेकडून राजू तडवी यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी शिवसेनेच्या पहिल्या यादीत या मतदार संघातून कोणाही उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राजू तडवी यांच्या विरोधात शिवसेना कुणाला उमेदवारी देते याकडे लक्ष आहे. काही महिन्यांपूर्वी अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती. लटके या महापालिका सेवेत कार्यरत होत्या, त्यांना सेवेचा राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतरच अर्ज भरता आला होता. त्यामुळे तडवी यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज भरू शकतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, शनिवारी त्यांनी मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.