Maharashtra Vidhan Sabha Election 2024: … म्हणुन मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही!

128
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ... म्हणुन मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ... म्हणुन मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही!

मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात मनसे उमेदवार (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे (Abhijit Panse) यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून देखील अभिजित पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

“राज ठाकरे दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस”
ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा माजिवडा इथून संदीप पाचांगे आणि कळवा मुंब्रा इथून सुशांत सूर्यराव हे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जरी अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, “राज ठाकरे दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

महायुतीमध्ये नेमकं काय शिजतयं?
मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन केसरकर राज ठाकरेंकडे (Raj Thackeray) गेल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत खलबतं सुरू असल्याचं बोललं जात आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.