Mayank Yadav : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही मयंक यादव संघात का नाही?

Mayank Yadav : मयंक यादवने अलीकडेच टी-२० प्रकारात भारतीय संघात पदार्पण केलं आहे. 

147
IPL 2025, Mayank Yadav : मयंक यादव लखनौच्या ताफ्यात परतला; राजस्थान विरुद्ध खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियाच्या बहुचर्चित दौऱ्यापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा छोटेखानी दौरा करणार आहे. या दौऱ्यात संघ फक्त ३ टी-२० सामने खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनंतर ८ नोव्हेंबरपासून हा दौरा सुरू होईल. या दौऱ्यासाठीचा भारतीय संघ शुक्रवारी जाहीर झाला आहे आणि यात मयंक यादवचं (Mayank Yadav) नाव नाहीए. ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करू शकणारा हा गोलंदाज संघात का नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याला कारण आहे दुखापतीचं. वेगवान आणि अचूक गोलंदाजी करू शकणारा मयांक त्याच्या शैलीमुळे दुखापतींनाही आमंत्रण देतो. आताच भारताकडून ३ टी-२० सामने खेळलेला मयंक पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या पाठीत पाणी झालं आहे आणि त्यावर लगेच उपचार आवश्यक आहेत.

आयपीएलमध्येही २३ वर्षीय मयंक (Mayank Yadav) ४ सामने खेळू शकला होता. पोटाचा स्नायू ताणला गेल्यामुळे उर्वरित आयपीएल तो खेळू शकला नव्हता. आताही ३ सामने खेळल्यानंतर तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मविआतील जागावाटपाच्या वाटाघाटीवरून Rahul Gandhi काँग्रेसच्या नेत्यांवर नाराज!)

यंदा आयपीएलमध्ये मयंक यादव (Mayank Yadav) जगाला पहिल्यांदा दिसला. सातत्याने ताशी १५० पेक्षा जास्त वेगाने आणि अचूक गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून पहिल्या दोन सामन्यांतच त्याने लौकिक मिळवला. लखनौ सुपरजायंट्ससाठी खेळणाऱ्या मयंकने पहिल्या सामन्यात १५५.८ किमी ताशी वेगाने टाकलेला चेंडू आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात वेगवान चेंडू ठरला होता. त्याने सामन्यात ३ बळीही मिळवले. तर बंगळुरू विरुद्ध त्याने १५६.७ किमी ताशी वेगाने चेंडू टाकला आणि आपलाच विक्रम पुढच्याच सामन्यात मोडला. या दोनही सामन्यांत त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. आयपीएलमध्ये १४ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

पण, त्याचवेळी दुखापतींना आमंत्रण देण्याऱ्या शैलीमुळे त्याला जपून खेळवावं लागत आहे. त्याला जपून वापरणं हे भारतीय संघ प्रशासनासमोरचं आव्हान असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.