NCP शरदचंद्र पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; उबाठाच्या विरोधात उमेदवार दिला

227

राष्ट्रवादी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी उमेदवारी यादी नेते जयंत पाटील यांनी शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी जाहीर केली. २२ उमेदवारांची ही दुसरी यादी आहे. तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाने आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादीने (NCP) आज परांडा येथे डॉ. तानाजी सावंत यांच्या विरोधात माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव घोषित केले आहे. या मतदारसंघात उमेदवार दिल्यानंतर आता मविआमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जयंत पाटील म्हणाले की, याबाबत आम्ही शिवसेनेशी चर्चा करू आणि वाद सोडविण्याचा प्रयत्न करू.

(हेही वाचा Maharashtra Assembly Election 2024 : उबाठाची ३ री यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी)

कोण कुठून लढणार?

  • एरंडोल – सतीश अण्णा पाटील
  • गंगापूर – सतीश चव्हाण
  • शहापूर – पांडुरंग बरोरा
  • भूम-परांडा – राहुल मोटे
  • बीड – संदीप क्षीरसागर
  • आर्वी – मयुरा काळे
  • बागलान – दीपिका चव्हाण
  • येवला – माणिकराव शिंदे
  • सिन्नर – उदय सांगळे
  • दिंडोरी – सुनीताताई चारोसकर
  • नाशिक पूर्व – गणेश गिते
  • उल्हासनगर – ओमी कलानी
  • जुन्नर – सत्यशील शेरकर
  • पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
  • खडकवासला – सचिन दोडके
  • पर्वती – अश्विनीताई कदम
  • अकोले – अमित भांगरे
  • अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
  • माळशिरस – उत्तम जानकर
  • फलटण – दीपक चव्हाण
  • चंदगड – नंदिनीताई कुपेकर
  • इचलकरंजी – मदन कारंडे

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.