Yashasvi Jaiswal : ‘या’ विक्रमासह यशस्वी जयस्वाल सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या पंक्तीत

Yashasvi Jaiswal : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. 

59
Yashasvi Jaiswal : ‘या’ विक्रमासह यशस्वी जयस्वाल सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या पंक्तीत
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंड विरुद्धची मालिका भारतीय संघाने गमावली आहे आणि फलंदाजांचं अपयश या मालिकेत भारताला भोवलं. इतर फलंदाज अपयशी ठरत असताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) मात्र सातत्यपूर्ण धावा करत आहे. आताही न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक त्याने झळकावलं आणि त्याचवेळी या हंगामातील १,००० कसोटी धावा त्याने पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर फलंदाजीतील एक विक्रम त्याने नावावर केला आहे. २३ वर्षीय यशस्वी भारतातील मालिकांमध्ये एका हंगामात १,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी गुडप्पा विश्वनाथ (१०४७) आणि सुनील गावस्कर (१०१३) यांनीच ही कामगिरी केली आहे.

दोघांनीही १९७९ मध्ये ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) २२ व्या वर्षीच ही कामगिरी केली आहे. आणि २३ वर्षांच्या आत अशी कामगिरी करणारा तो फक्त पहिला फलंदाज आहे. आपल्या एकूण कसोटी कारकीर्दीत जयस्वालने १,३०० धावा केल्या आहेत त्या ६० च्या सरासरीने. यात ३ शतकं आणि ८ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. २ द्विशतकंही त्याने केली आहेत.

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांच्या घरी अनंत अंबानी, बंद खोलीत २ तास चर्चा)

मायदेशात एका हंगामात १,००० हून अधिक धावा करणारे फलंदाज पुढील प्रमाणे,

गुंडाप्पा विश्वनाथ (भारत) – १,०४७ (१९७९)

सुनील गावस्कर (भारत) – १,०१३ (१९७९)

ग्रॅहम गूच (इंग्लंड) – १,०५८ (१९९०)

जस्टिन लँगर (ऑस्ट्रेलिया) – १,०१२ (२००४)

मोहम्मद युसुफ (पाकिस्तान) – १,११२ (२००६)

मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया) – १,४०७ (२००८)

यशस्वी जयस्वाल (भारत) – १०००* (२०२४)

(हेही वाचा – NCP शरदचंद्र पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; उबाठाच्या विरोधात उमेदवार दिला)

पुणे कसोटीत यशस्वीने (Yashasvi Jaiswal) आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. या बाबतीत न्यूझीलंडचाच माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. मॅक्युलमने २०१४ मध्ये एका वर्षांत ३० षटकार खेचले होते. यशस्वीने पुणे कसोटीतील दुसऱ्या डावातील ३ षटकार धरले तर आतापर्यंत ३० षटकार ठोकले आहेत. आणि मालिकेतील आणखी १ कसोटी तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ कसोटी अजून बाकी आहेत. म्हणजेच यशस्वी मॅक्युलमला मागे टाकू शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.