Virat Kohli : विराट कोहलीला एका कसोटीत दोनदा बाद करणारा मिचेल सँटनर

Virat Kohli : विराट कोहलीला एका कसोटीच्या दोन्ही डावांत बाद करून सँटनरने विक्रम केला आहे.

38
Virat Kohli : विराट कोहलीला एका कसोटीत दोनदा बाद करणारा मिचेल सँटनर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने पुणे कसोटी तिसऱ्या दिवशीच गमावून मालिकाही गमावली आहे. त्यांच्याकडे आता ०-२ अशी पिछाडी आहे. मालिकेतील एकमेव मुंबई कसोटी बाकी आहे. फलंदाजांचं अपयश हे त्यासाठीचं महत्त्वाचं कारण आहे. रोहित, विराट हे महत्त्वाचे ज्येष्ठ खेळाडू सातत्याने अपयशी ठरत आहेत. विराट कोहली (Virat Kohli) पुणे कसोटीच्या पहिल्या डावात बेजबाबदारी फटका खेळून १ धावेवर त्रिफळाचीत झाला होता. आता दुसऱ्या डावात एक चेंडू त्याला चकवून गेला. चेंडू त्याच्या पॅडवर बसला आणि तो पायचीत झाला. चेंडू लेग स्टंपला चाटून गेला असता असं रिप्लेमध्ये दिसलं. विराट कमनशिबी ठरला असला तरी बंगळुरू आणि पुणे अशा दोन्ही कसोटीत फिरकीपटूंनी त्याला कोंडीत पकडलं.

(हेही वाचा – शिंदेंच्या नेत्यांच्या Jarange Patil यांच्याशी भेटीगाठी; काय आहे प्लॅन?)

पुणे कसोटीत दोन्ही डावात त्याला बाद करणारा गोलंदाज होता मिचेल सँटनर. ही कामगिरी करून त्याने एक विक्रमही नावावर केला आहे. ४० चेंडूंत १७ धावा करणारा कोहली (Virat Kohli) तेव्हा खेळपट्टीवर जम बसवून खेळत होता. सँटनरचा खूप आत वळलेला चेंडू तो खेळायला गेला. पण, चकला आणि चेंडू त्याच्या पॅडवर बसला. विराटने तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पण, चेंडू अगदी हलकेच लेग स्टंपला चाटून गेल्याचं त्यात दिसलं. तिसऱ्या पंचांनीही मैदानावरील पंचांचा निर्णय उचलून धरला. विराट अगदी निराश होऊन तंबूत परतला.

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांच्या घरी अनंत अंबानी, बंद खोलीत २ तास चर्चा)

या कसोटीत दोन्ही डावांत विराट सँटनरचाच बळी ठरला. या कामगिरीसह एकाच कसोटीत दोनदा विराटला (Virat Kohli) बाद करणारा सँटनर हा पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. पुढे जाऊन सँटनरने सर्फराझ खानलाही बाद केलं आणि डावात पुन्हा एकदा पाच बळी घेतले. सँटनरने दोन्ही डावात मिळून सामन्यात १३ बळी घेतले. यापूर्वी दोन्ही डावांत भारताविरुद्ध आणि ते ही भारतात ५ पेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन ओ कॅफीने २०१७ मध्ये केली होती. त्याने दोन्ही डावांत प्रत्येकी ६ बळी घेतले होते. त्याचबरोबर सँटनरने पहिल्या डावात फलंदाजी करताना मोलाच्या ३४ धावाही केल्या. आणि रिषभ पंतला धावचीतही केलं. या अष्टपैलू कामगिरीसाठी मिचेल सँटनरला सामनावीराचा मान मिळाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.