Pak vs Eng : पाकिस्तानची इंग्लंडवर ९ गडी राखून मात, मालिकाही जिंकली

Pak vs Eng : रावळपिंडी कसोटी जिंकत पाकने मालिका २-१ ने जिंकली. 

76
Pak vs Eng : पाकिस्तानची इंग्लंडवर ९ गडी राखून मात, मालिकाही जिंकली
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पहिली मुलतान कसोटी हरल्यानंतर पाकिस्तान संघाने जोरदार पुनरागमन करत पुढील दोन कसोटी जिंकल्या आहेत. तिसऱ्या रावळपिंडी कसोटीत तर संपूर्ण वर्चस्व राखत पाकने इंग्लंडला फिरकीच्या जाळ्यात ओढलं. साजिद खान, नोमान अली यांनी संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला आहे. पाकिस्तानने पहिल्या डावांत ७७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लिश फलंदाजांना त्यांनी ११२ धावांतच गुंडाळलं. नोमानने ४२ धावांत ६ तर साजिदने ६९ धावांत ४ बळी मिळवले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक ३६ धावा पाक संघाने एक गडी गमावतच केल्या. तिसऱ्या दिवसी खानपानाच्या पूर्वीच पाकिस्तानने हा विजय साकार केला. (Pak vs Eng)

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांच्या घरी अनंत अंबानी, बंद खोलीत २ तास चर्चा)

(हेही वाचा – Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला वगळल्यामुळे चाहते नाराज, सोशल मीडियावर मोहीम)

सलामीवीर सैम अयूब झटपट बाद झाला असला तरी शान मसूदने जॅक लीचला सलग चार चौकार आणि मग शोएब बशिरला एक षटकार खेचत पाक विजयाची औपचारिकता पूर्ण केली. नोमान आणि साजिद या दोघांनी मिळून २० पैकी १९ इंग्लिश बळी मिळवले. पहिली मुलतान कसोटी गमावल्यानंतर पाकिस्तान संघाने अचानक आपला पवित्रा बदलत मालिकेत आक्रमक खेळ केला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर नोमान आणि साजिद यांनीच संघाला विजय मिळवून दिला. दोघांनी शेवटच्या दोन कसोटीत मिळून एकूण ३९ बळी मिळवले. जो रुट या एकमेव इंग्लिश फलंदाजाने सामन्यात ३३ धावा केल्या. बाकी फलंदाज फिरकीसमोर चाचपडताना दिसले. (Pak vs Eng)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.