Maharashtra Election Assembly 2024 : मनसेची पाचवी यादी जाहीर; ‘आमित देशमुख’ ही उमेदवारी यादीत!

120
Maharashtra Election Assembly 2024 : मनसेची पाचवी यादी जाहीर; ‘आमित देशमुख’ ही उमेदवारी यादीत!
Maharashtra Election Assembly 2024 : मनसेची पाचवी यादी जाहीर; ‘आमित देशमुख’ ही उमेदवारी यादीत!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर करत आहेत. शनिवार २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी (MNS Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मनसेच्या १५ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेने कोणाला कुठून तिकीट दिलं आहे, हे जाणून घेऊ… (Maharashtra Assembly Election 2024)

मनसेने पाचवी (MNS 5 th Candidate List) यादी जाहीर केली असून, यामध्ये पनवेलमधून योगेश चिलेंना संधी तर काटोलमधून सागर दुधानेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे.

मनसेच्या पाचव्या यादीत कोणाचा समावेश?

पनवेल – योगेश चिले
खामगाव – शिवशंकर लगर
अक्कलकोट – मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य – नागेश पासकंटी
जळगाव जामोद – अमित देशमुख
मेहकर – भैय्यासाहेब पाटील
गंगाखेड – रुपेश देशमुख
उमरेड – शेखर टुंडे
फुलंब्री – बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा – राजेंद्र गपाट
उस्मानाबाद – देवदत्त मोरे
काटोल – सागर दुधाने
बीड – सोमेश्वर कदम
श्रीवर्धन – फैझल पोपेरे
राधानगरी – युवराज येडुरे

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : रासपची ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर)

अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी निवडणुकांपूर्वीच विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत ही इच्छा मांडली होती. त्यानुसार, राज ठाकरे स्वतः अमित ठाकरे यांच्या मतदारसंघाची चाचपणी करत होते. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. मात्र आता अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभा (Mahim Assembly) निवडणूक लढवणार आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.