- खास प्रतिनिधी
मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाने सुनील प्रभू यांना पुन्हा एकदा विधानसभेला निवडणूक लढण्याची संधी दिली असून त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाकडून बिहारी चेहेरा देण्याची तयारी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Maharashtra Assembly Poll)
शिवसेनेचे प्राबल्य
या मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अशी पंचरंगी लढत होऊनही शिवसेनेचे सुनील प्रभू २०,००० च्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसकडून राजहंस सिंह आणि भाजपाकडून मोहित कंबोज तर मनसेकडून शालिनी ठाकरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. राजहंस सिंह तसेच कंबोज या दोघांना प्रत्येकी ३६,००० हून अधिक मते मिळाली होती तर शालिनी ठाकरे यांना केवळ १४,००० मतांवर समाधान मानावे लागले होते. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा – UBT मध्ये ‘या’ दोन नेत्यांनी उपसले बंडाचे निशाण)
दोघांच्या मतांची बेरीज अधिक
प्रभू यांनी मात्र ५६,००० पेक्षा अधिक मते घेत विजय मिळवला होता. मात्र कंबोज आणि सिंह यांच्या मतांची बेरीज केली तर प्रभू यांच्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघात अमराठी उमेदवारही एकगठ्ठा मते घेऊन विजयी वाटचाल करू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही.
पुढे २०१९ मध्ये तर प्रभू यांचे मताधिक्य वाढले. प्रभू यांना ८२,२०३ मते मिळाली तर विद्या चव्हाण यांना दुसऱ्या क्रमांकाची ३७,६९२ मते मिळाली तर मनसे उमेदवार अरुण सुर्वे यांना २५,८५४ मते पडली. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : रासपची ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर)
मूळचे शिवसैनिक
त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य असून यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार शिवसेना उबाठा आणि शिवसेना (शिंदे) एकमेकांविरुद्ध मैदानात दिसतील. पक्षाची ताकद लक्षात घेऊनच मूळचे शिवसैनिक असलेले बिहारीबाबू संजय निरुपम यांना शिवसेना (शिंदे) यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि गुजराती, जैन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. (Maharashtra Assembly Poll)
अन्य इच्छुक
दरम्यान या मतदारसंघातून शिवसेनेचे (शिंदे) दिंडोशी विधानसभा संघटक वैभव भरडकर, विभागप्रमुख गणेश शिंदे हेही इच्छुक असून या मतदारसंघात मराठी उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी शिंदे समर्थकांनी केली आहे. (Maharashtra Assembly Poll)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community