मविआत फुट, ‘या’ मतदारसंघात उबाठाने उमेदवार दिल्याने Congress चा इच्छुक प्रवक्ता नाराज

67
मविआत फुट, 'या' मतदारसंघात उबाठाने उमेदवार दिल्याने Congress चा इच्छुक प्रवक्ता नाराज
मविआत फुट, 'या' मतदारसंघात उबाठाने उमेदवार दिल्याने Congress चा इच्छुक प्रवक्ता नाराज

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली. अशातच दि. २६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र, ही यादी जाहीर होण्याच्या अवघ्या काही मिनटात काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत यांनी उमेदवारी मागे घेण्याची मागणी काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Congress)

( हेही वाचा : ICC Test Championship : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारताचं कसोटी अजिंक्यपद अव्वल स्थानही धोक्यात

एक्सवर पोस्ट करत सचिन सावंत यांनी लिहले की, मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे ही ते म्हणालेत. (Congress)

काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत यांच्या एक्सवरील पोस्टवरून लक्षात येते की, वांद्रे पूर्व विधानसभेसाठी ते आग्रही आहेत. अन्यथा ते निवडणुक लढवणार नाहीत. त्यामुळे रमेश चेन्निथला यांनाही त्यांनी पक्षाने निर्णय बदलावा अशी विनंती केली. अर्थात पक्षाला त्यांच्या विनंतीचा मान ठेवावा लागणार. मात्र त्यासाठी काँग्रेसला उबाठा गटाशी बातचीत करून सहकार्याने अन्यथा वादाने प्रश्न सोडवावा लागेल. त्यात विधानसभेत काँग्रेस आणि उबाठा गटात विदर्भातील अन्य काही जागांवरून वाद आहे.त्यामुळे काँग्रेस आणि उबाठाच्या भांडणात मविआत फुट पडण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत चालली आहे. (Congress)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.