Nana Patole यांच्या ‘त्या’ विनंती पत्रामुळे ठाकरे- पवार नाराज, मविआत पुन्हा वादाची ठिणगी

139
Nana Patole यांच्या 'त्या' विनंती पत्रामुळे ठाकरे- पवार नाराज, मविआत पुन्हा वादाची ठिणगी
Nana Patole यांच्या 'त्या' विनंती पत्रामुळे ठाकरे- पवार नाराज, मविआत पुन्हा वादाची ठिणगी

काँग्रेसकडून निवडून येऊ शकणाऱ्या जागांवर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातर्फे दावा केला जात असल्याने नाराज झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पटोलेंनी घटक पक्षातील इतर दोन्ही पक्षांनी काँग्रेसच्या हक्काच्या जागांवर दावा करू नये, अशी विनंती केली आहे.

( हेही वाचा : दिल्ली, मुंबई, जयपूरसह ५ शहरांमध्ये EDची छापेमारी; कोल्डप्ले आणि दिलजीतचा कॉन्सर्ट EDच्या रडारवर

दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पटोलेंनी (Nana Patole ) असे पत्र पाठवणे आवडले नाही. त्यावर जागावाटपातील वाद चर्चेतून सोडवायचे असतात, असे पत्र लिहून काहीही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया पवार आणि ठाकरे यांनी काँग्रेसला दिले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. त्यातच पटोलेंनी (Nana Patole ) पवार आणि ठाकरेंना पत्र देऊन काँग्रेसमधील इच्छुकांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. त्यात काँग्रेस आणि ठाकरे गट विदर्भातील जागांवरून आमनेसामने आले आहेत.

पटोले (Nana Patole ) पत्रात म्हणाले की, मविआतील जागावाटपात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आधार घेऊन विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईत काँग्रेसने जास्त जागा मागितल्या आहेत. या जागांवर काँग्रेस जिंकेल असे वारंवार सांगण्यात आले असून ही मुद्दाम या जागांवर दावा केला जात आहे. लोकसभेत ही सांगलीच्या जागेचा असाच हट्ट धरण्यात आला होता. मात्र तिथे उबाठाला फटका बसला. त्यामुळे आपण या जागांवरील दावा सोडावा, अशी विनंती पटोले (Nana Patole ) यांनी या दोन नेत्यांना केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.