Vasubaras 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रांगोळीच्या रूपात अवतरली कामधेनू 

90

सोमवार, २७ ऑक्टोबरपासून दीपावलीला प्रारंभ होत आहे. आपल्या हिंदु संस्कृतीत ज्या गायीला आपण पूज्य देवता मानतो, त्या गायीच्या पूजनाने वसुबारसच्या (Vasubaras 2024) निमित्ताने दिवाळीच्या उत्सवाचा आरंभ होतो. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सुंदर रांगोळीच्या रूपाने कामधेनु अवतरली.

या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही (Vasubaras 2024)  म्हणतात. या दिवशी सवत्स धेनूची म्हणजे गाय आणि तिच्या पाडसाची पूजा केली जाते. सवत्स धेनू हे पृथ्वीचेच एक रूप आहे. वसु म्हणजे पृथ्वी. तिच्या अंगाखांद्यावर आपण बागडतो; म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यातून वात्सल्य, प्रेम आणि जिव्हाळा प्रतीत होतो.

(हेही वाचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन)

अशा वसुबारसच्या (Vasubaras 2024) निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कर्मचारी आदिती मटकीकर, ऋतिका जैन यांनी वसुबारस निमित्त स्मारकाच्या कार्यालयात वीर सावरकर यांच्या प्रतिमेच्या समोर गायीचे चित्र असलेली सुरेख रांगोळी काढली.  यानिमित्ताने स्मारकात रांगोळीच्या रूपात कामधेनू अवतरली, असे वातावरण होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.