डिजिटल अरेस्टपासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाची जागरुकता आवश्यक; PM Narendra Modi यांची ‘मन की बात’

102

डिजिटल अरेस्ट (Digital arrest) अशी कुठलीही व्यवस्था कायद्यात नाही, हा फ्राॅड आहे, फसवणूक आहे, खोटे आहे, बदमाशांचा घाला आहे आणि जे लोक हे करतात ते समाजाचे शत्रू आहेत. डिजिटल अरेस्टच्या नावाने जी फसवणूक चाललेली आहे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक शोध संस्था, राज्य सरकार बरोबर काम करीत आहेत. या संस्थांमध्ये ताळमेळ राहावा म्हणून राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची (National Cyber Co Ordination Centre) स्थापना केली गेली आहे. एजन्सीजकडून अशा फ्राॅ़ड व्हिडिओ, काॅलिंग आयडीला ब्लाॅक केले गेले आहे. लाखो सिमकार्ड, मोबाईल फोन आणि बॅंक खाती ब्लाॅक केली आहेत. एजन्सीज आपले काम करीत आहेत, पण डिजिटल अरेस्टच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जागरुकता आवश्यक आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी केले.

‘मन की बात’च्या 115 व्या भागातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. जे लोक या प्रकारच्या सायबर फ्राॅडचे बळी ठरतात, त्यांनी जास्तीत जास्त लोकाना याबद्दल सांगायला हवे. तुम्ही जागरुकतेसाठी #safeDigitalIndia चा वापर करु शकता. मी शाळा आणि महाविद्यालयाना सांगीन की सायबर स्कॅम विरूद्धच्या मोहिमेत विद्यार्थ्यानाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

(हेही वाचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन)

भारतासमोर प्रत्येक युगात काही आव्हाने उभी राहिली आणि प्रत्येक युगात असे काही असामान्य भारतीय जन्माला आले ज्यांनी या आव्हानांचा सामना केला. आजच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी धैर्य आणि दूरदृष्टी असणाऱ्या अशा दोन महान वीरांविषयी माहिती दिली. देशाने त्यांची 150 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांचे 150 वे जयंती वर्ष सुरू होणार आहे. या दोन्ही महापुरुषांसमोर उभी ठाकलेली आव्हाने वेगवेगळी होती, पण ‘देशाची एकता‘ हा एकच दृष्टीकोन या दोघांकडे होता. सरकारने जरी या महान व्यक्तींची 150 वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी केवळ आपला सहभागच या मोहिमेला संजीवनी देईल आणि ती मोहीम जिवंत करेल. मी तुम्हा सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो. लोहपुरुष सरदार पटेल यांच्याविषयीचे तुमचे विचार आणि कार्य #Sardar150 ह्या हॅशटॅगसह लिहा आणि धरती-आबा बिरसा मुंडा ह्यांची प्रेरणा #BirsaMunda150 ह्या हॅशटॅगसह प्रसिद्ध करा. चला, आपण सगळे एकत्र येऊन हा उत्सव भारताच्या विविधतेतील एकतेचा उत्सव करू या, आपल्या महान वारश्याचा आणि विकासाचा उत्सव करुया, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  म्हणाले.

आज आपले युवक मूळ भारतीय कंटेंट तयार करत आहेत, ज्यात आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. हे जगभरात पाहिले जात आहे. ॲनिमेशन क्षेत्र आज असा उद्योग झाला आहे जो इतर उद्योगांनाही बळ देत आहे, जसे की, सध्या VR पर्यटन (आभासी सहल) खूप प्रसिद्ध होत आहे. तुम्ही आभासी पर्यटनाद्वारे अजिंठा लेणी पाहू शकता, कोणार्क मंदिराच्या परिसरात फिरू शकता किंवा वाराणसीच्या घाटांवर जाण्याचा आनंद घेऊ शकता. हे सर्व व्हीआर ॲनिमेशन भारतीय निर्मात्यांनी तयार केले आहेत. VR च्या माध्यमातून ही ठिकाणे पाहिल्यानंतर अनेकांना या पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा निर्माण होते आहे, म्हणजे पर्यटन स्थळाची आभासी सहल हे लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचे माध्यम बनले आहे. आज, या क्षेत्रात, ॲनिमेटर्ससोबतच कथाकथनकार, लेखक, व्हॉइस-ओव्हर तज्ञ, संगीतकार, गेम डेव्हलपर्स, VR आणि AR तज्ञांची मागणी देखील सातत्याने वाढते आहे. म्हणून, मी भारतातील तरुणांना म्हणेन तुमची सर्जनशीलता वाढवा. कोणास ठाऊक, कदाचित जगातील पुढचे सुपरहिट ॲनिमेशन तुमच्या संगणकातून निर्माण होईल! भविष्यातील एखादा व्हायरल गेम तुमची निर्मिती असू शकेल! शैक्षणिक ॲनिमेशनमधील तुमचा नवा उपक्रम मोठे यश मिळवू शकेल. या 28 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या ‘जागतिक ॲनिमेशन दिवस’ देखील साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करूया, असे आवाहनही , असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.