IndiGo Flight : इंडिगोच्या पुणे-जोधपूर विमानांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी

95
IndiGo Flight : इंडिगोच्या पुणे-जोधपूर विमानांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी
IndiGo Flight : इंडिगोच्या पुणे-जोधपूर विमानांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी

विमान बॉम्बने उडवण्याच्या धमक्या येण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाही. रविवारी (२७ ऑक्टोबर) पुण्याहून जोधपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या आणखी एका विमानालाही अशीच धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर विमान जोधपूरला उतरल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली. (IndiGo Flight )

रविवारी इंडिगो (IndiGo Flight) आणि अकासाच्या (Akasa Flight) बंगळुरूहून अयोध्येला जाणाऱ्या फ्लाइटलाही अशीच धमकी मिळाली होती. कोलकाताहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या (Indigo Flight) विमानालाही बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर कोलकाताहून पुण्याला जाणाऱ्या आकासा आणि इंडिगोच्या विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

(हेही वाचा – डिजिटल अरेस्टपासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाची जागरुकता आवश्यक; PM Narendra Modi यांची ‘मन की बात’)

सलग तिसऱ्यांदा धमक्या मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून विमानांना बॉम्बच्या धमक्या (Bomb threats) मिळत आहेत. देशभरातील विमानांना बॉम्बस्फोट (Bombing) घडवून आणण्याच्या धमक्या सातत्याने दिल्या जात आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.