Onion : कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने काढला रामबाण उपाय

69

केंद्र सरकारकडून कांद्याचे (Onion) बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिल्याने अफगाणिस्तान पाठोपाठ आताइजिप्त व तुर्की मधून १२० टन कांदा दाखल झाला आहे. सदरचा कांदा मुंबई, पुणेसह मेट्रो शहरात दाखल झाला आहे. या कांद्याच्या आयतीने ग्राहकांना कमी दरात कांदा मिळावा यासाठी केंद्र सरकारने केलेला प्रयत्न आहे.

नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सरकार कांदा (Onion) बाजार भाव पाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु सरकारने इजिप्त व तुर्की येथून मुंबई, पुणे या मेट्रो सिटीत कांदा आणून शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजार भाव पाडण्याचे काम करत असल्याचे कांदा व्यापारी प्रवीण कदम यांनी सांगितले.

(हेही वाचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन)

कांद्याचे (Onion) बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत पाच लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता, त्यातील कांदा दिल्ली, मुंबई, चेन्नई कोलकत्ता, भुवनेश्वर या देशातील मेगा मेट्रो सिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे केंद्रे सुरू करत विक्री सुरू केली, मात्र कांद्याचे (Onion) दर नियंत्रणात येत नसल्यामुळे आता केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली मागील महिन्यात २४ सप्टेंबर मध्ये अफगाणिस्तान मधून पंजाब राज्यातील अमृतसर जालिंदर या शहरांमध्ये अकरा मालट्रक मधून 300 टन अधिक कांदा दाखल झाला होता आता पुन्हा इजिप्त व तुर्की मधून १२० टन कांदा दाखल झाला आहे.

केंद्र सरकारने कांदा (Onion) निर्यातीस चालना देणे गरजेचे असताना आयात करण्याचे धोरण राबवून भाव स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्राने निर्यातीस चालना देणे गरजेचे असून जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल, अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.