येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा दावा 

124
‘लाडकी बहीण योजने'चा फायदा कुणाला? DCM Devendra Fadnavis म्हणाले, मतदानाचा टक्का…
‘लाडकी बहीण योजने'चा फायदा कुणाला? DCM Devendra Fadnavis म्हणाले, मतदानाचा टक्का…

राज्यात विधानसभा २०२४ च्या निवडणुकीचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची नावे देखील जाहीर करणे सुरू असून ही प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा सरकार कोणाचे येणार यावर बोलताना महायुतीचे सरकारच येईल असा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे. (Devendra Fadnavis)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, हरियाणाबाबत सगळे पोलपंडीत सांगत होते भाजपाचा दारुण पराभव होणार. पण भाजपाला प्रचंड बहुमत मिळाली. त्यामुळे सकाळी टीव्हीसमोर बोलणारे दुपारी काय बोलू या संभ्रमात पडले होते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नाव न घेता टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळवता आले. फेक नरेटिव्हच्या भरवशावर त्यांनी यश मिळवले, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – IndiGo Flight : इंडिगोच्या पुणे-जोधपूर विमानांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी)

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamnatri Ladki Bahin Yojana) मी हे सांगू इच्छितो की आमच्या विरोधकांचं कन्फ्युजन बघा. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार, निवडणुकीनंतर योजना बंद होणार. दुसरीकडे तेच भाषणांमध्ये सांगतात की हे 1500 रुपये देतात आम्ही निवडून आलो तर 2000 रुपये देऊ. यांच्याकडे खजिना आहे का? पैशांचं झाड आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.