पुण्यात Congress भवनात शहराध्यक्षांना धक्काबुक्की ?

50

काँग्रेस पक्षाकडून शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब झाले नाही, दरम्यान पक्षातील उमेदवाराला संधी देण्याऐवजी आयात उमेदवाराच्याच नावाची चर्चा सुरू झाल्याने अखेर इच्छुक उमेदवारांच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांना काँग्रेस भावनात धक्काबुक्की झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती, शिंदे यांनी मात्र अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात असून असा काही प्रकार घडलाच नसल्याचे स्पष्ट केले. हा सर्व प्रकार पक्षाने पाठवलेल्या पश्चिम महाराष्ट्र निरीक्षकांसमोरच घडल्याने पक्षांतर्गत वादाला पुन्हा तोंड फुटल्याचीही चिन्हे आहेत. (Congress)

(हेही वाचा – येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा दावा )

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या पक्षांकडून शहरातील बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाने कसबा मतदार (Kasba voters) संघातून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची घोषणा केली, मात्र शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची अद्यापही घोषणा केलेली नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.