आगमी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) आणखी एक यादी जाहीर करण्यात आली आहे. रविवार 27 ऑक्टोबर रोजी मनसेकडून सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 32 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात देखील उमेदवार दिला आहे. साईप्रसाद जटालवार (SaiPrasad Jatalwar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसे पक्षाने सहाव्या यादीपर्यंत 117 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/wV94RhLmei
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 27, 2024
मनसेच्या सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे:
नंदुरबार – वासुदेव गांगुर्डे
मुक्ताईनगर – अनिल गंगतिरे
आर्वी – विजय वाघमारे
सावनेर – घनश्याम निखाडे
नागपूर पूर्व – अजय मारोडे
कामठी -गणेश मुदलियार
अर्जुनी-मोरगाव – भावेश कुंभारे
अहेरी – संदीप कोरेत
राळेगाव – अशोक मेश्राम
भोकर – साईप्रसाद जटालवार
नांदेड उत्तर – सदाशिव आरसुळे
परभणी – श्रीनिवास लाहोटी
कल्याण पश्चिम – उल्हास भोईर
उल्हास नगर – भगवान भालेराव
आंबेगाव – सुनील इंदोरे
संगमनेर – योगेश सूर्यवंशी
राहुरी – ज्ञानेश्वर गाडे (माऊली)
नगर शहर – सचिन डफळ
माजलगाव – श्रीराम बादाडे
दापोली- संतोष अबगुल
इचलकरंजी – रवी गोंदकर
भंडारा – अश्विनी लांडगे
अरमोरी – रामकृष्ण मडावी
कन्नड – लखन चव्हाण
या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Diwali 2024 : यंदाच्या दिवाळीत ४.२५ लाख कोटी रुपयांची बाजारात उलाढाल होण्याचा अंदाज)
अमित ठाकरे यांना उमेदवारी, महायुती पाठिंबा देणार?
मनसेकडून माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण ही जागा शिवसेनेची पारंपरिक जागा आहे. या जागेवर शिवसेनेचे सदा सरवणकर गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत. मनसेने अमित ठाकरे यांना या जागेवर उमेदवारी दिल्याने भाजपाकडून सदा सरवणकर (Sada Saravankar) यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले आहेत. सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी भाजपची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याने सदा सरवणकर यांनी युती धर्माचं पालन करुन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केल्याची माहिती आहे. पण सदा सरवणकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community