Bandra Stampede: वांद्रे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य-पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय; ‘या’ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही

157
Bandra Stampede: वांद्रे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य-पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय; 'या' रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही
Bandra Stampede: वांद्रे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य-पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय; 'या' रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी (Bandra Stampede) झाली. अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना ही चेंगराचेंगरी झाली होती. तसंच, रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त विशेष गाडीला उशीर झाला त्यामुळं ती गाडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वांद्रे ते गोरखपूरपर्यंत धावणारी अंत्योदय एक्स्प्रेस (Antyodaya Express) सुटणार होती. या ट्रेनसाठी बुकिंग किंवा रिझर्व्हेशन लागत नाही. त्यामुळं विशेष ट्रेनला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती. (Bandra Stampede)

ट्रेन फलाटावर लागत असतानाच प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात अनेकजण फलाटावर पडले त्यामुळं चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 9 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवशांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येत आहे. वांद्रे स्थानकात घडलेल्या या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात एक पोस्ट करत प्रवाशांना माहिती दिली आहे. (Bandra Stampede)

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवरील (Central Railway) अनेक रेल्वे स्थानकांतून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. त्यामुळे मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर या रेल्वे स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री थांबवण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत तिकिटाची विक्री या स्थानकांत करता येणार नाही, असा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांनायातून सूट देण्यात आली आहे. (Bandra Stampede)

पश्चिम रेल्वे
मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेनेही (Western Railway) प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध आणले आहेत. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना आणि सूरत या स्थानकात प्लॅटफॉर्म विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. जेणेकरुन स्थानकात गर्दी होणार नाही. (Bandra Stampede)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.