Air Pollution : देशातील 11 शहरांतील प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी

146
Air Pollution : देशातील 11 शहरांतील प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी
Air Pollution : देशातील 11 शहरांतील प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी

दिवाळीच्या अवघ्या चार दिवस आधी देशभरातील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. रविवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत देशातील 11 शहरांची AQI पातळी 300 च्या वर नोंदवण्यात आली होती. यामध्ये भिवाडी, दिल्ली, नोएडा, मेरठ, गाझियाबाद, जयपूर, बुलंदशहर, अमृतसर, अलीगढ, सोनीपत आणि फरिदाबाद या शहरांचा समावेश आहे. मुंबईतील (Mumbai) मरिन ड्राईव्हवरही सकाळी धुक्याचा थर पाहायला मिळाला. प्रदूषणामुळे देशाच्या राजधानीची घुसमट होत असताना दिवाळीच्या सणामुळे वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे त्यात आणखीनच भर पडणार असल्याचे चिंता वाढली आहे. (Air Pollution)

दिवाळीपूर्वी दिल्लीतील वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) 1 जानेवारी 2025 पर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे. शासनाच्या आदेशानुसार फटाके बनवणे, साठवणे, विक्री करणे आणि वापरणे यावर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही, तर फटाक्यांच्या ऑनलाइन वितरणावरही बंदी घालण्यात येणार आहे. यामध्ये हरित फटाक्यांचाही समावेश आहे. या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आपला अहवाल दररोज डीपीसीसीला सादर करतील.

राजस्थानमधील भिवडी ६१० हवा गुणवत्ता निर्देशांकासह सर्वांत धोकादायक स्थितीत होते. याचवेळी दिल्लीची स्थितीही गॅस चेंबरसारखी झाली असून, येथे रविवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी आनंद विहारमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ४००वर होता. आग्रामध्येही प्रदूषण आणि धुक्यामुळे ताजमहाल अस्पष्ट दिसत होता.

दिल्लीच्या एअर क्वालिटी इंडेक्सने २०० ओलांडल्यानंतर कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंटने एजन्सींना जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या (BS-III पेट्रोल आणि BS-IV डिझेल) ऑपरेशनवर कठोरपणे निरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते बांधणी, नूतनीकरण प्रकल्प आणि देखभाल कार्यांमध्ये धूरविरोधी गन, पाणी शिंपडणे आणि धूळ नाशक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास आयोगाने एजन्सींना सांगितले आहे. (Air Pollution)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.