शरद पवार गटातील गटबाजी चव्हाट्यावर; Jitendra Awhad आणि युनूस शेख यांच्यात माध्यमांसमोर धक्काबुक्की

97
शरद पवार गटातील गटबाजी चव्हाट्यावर; Jitendra Awhad आणि युनूस शेख यांच्यात धक्काबुक्की
शरद पवार गटातील गटबाजी चव्हाट्यावर; Jitendra Awhad आणि युनूस शेख यांच्यात धक्काबुक्की

मुंब्रा (Mumbra) विधानसभा मतदारसंघात रविवार, २७ ऑक्टोबरच्या रात्री शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि पक्षाचे राज्य अल्पसंख्यांक उपाध्यक्ष युनूस शेख यांच्यात मोठा वाद झाला. माध्यमांसमोरच दोघांमधील वादावादी इतकी विकोपाला गेली की, धक्काबुक्कीची वेळ आली. मुंब्रा या मुसलमानबहुल मतदारसंघात सातत्याने धर्मांधांचे लांगूलचालन करणारे जितेंद्र आव्हाड आणि अल्पसंख्यांक पदाधिकारी यांच्यातील वादामुळे शरद पवार गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

(हेही वाचा – “तुम्हीच सांगा मी लढलो तर मी जिंकेन की हरेन?”, Sada Sarvankar यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल)

जितेंद्र आव्हाड आणि युनूस शेख (Yunus Shaikh) यांच्यातील बाचाबाची जाहीरनाम्यावरुन झाल्याचे सांगण्यात येते. दोन मोठ्या नेत्यांमध्ये कॅमेऱ्यासमोरच धक्काबुक्की होत असल्याचे पाहून उपस्थित लोकांनी मध्यस्थी केली. राज्यात राष्ट्रवादीचे शरद पवार आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यात एकमेकांना ताकद दाखविण्याची स्पर्धा सुरू असतानाच शरद पवार गटातील दोन नेत्यांच सारे काही ठीक नसल्याचे समोर आले आहे.

या वेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष युनूस शेख म्हणाले, “माझी नाराजी शरद पवार यांच्याबद्दल नव्हती, तर पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष शमीम खान यांच्यावर होती आणि ती कायम राहील. निवडणुकीमुळे आम्ही शांत आहोत. पण शमीम खान यांच्याशी माझा वाद सुरू होताच. जितेंद्र आहवाड यांनी आश्वासन दिले आहे की, जाहीरनाम्याचे एक नवीन पुस्तक प्रकाशित होईल. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याशी माझे जवळपास चार वेळा भांडण झाले आहे, पण त्यांच्या चांगल्या कामाचा विचार करून मी नेहमीच मागे हटलो. माझा समाज आणि मुंब्याचा विकास याला माझे प्राधान्य आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.