Amit Thackeray यांनी दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा; नेमकं काय म्हणाले ?

81
Amit Thackeray यांनी दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा; नेमकं काय म्हणाले ?
Amit Thackeray यांनी दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा; नेमकं काय म्हणाले ?

माहिम विधानसभा मतदारसंघासाठी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अमित ठाकरेंसोबत राज ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, आई शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते. अमित ठाकरे उमेदवारी दाखल करताना मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी केली होती.

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी)

यावेळी अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी निवडणुकीसाठी तयार आहे. बाकी कोणाबाबत मला माहिती नाही. कोण फॉर्म मागे घेणार याबाबत माहीत नाही. मी माझा व्हीजन घेऊन पुढे जाणार आहे. माझ्यावर दडपण नाही. मला माध्यमांशी बोलतानाचा दडपण जाणवतं, हेच एक दडपण आहे.” अशी मिश्किल प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली.

(हेही वाचा-“तुम्हीच सांगा मी लढलो तर मी जिंकेन की हरेन?”, Sada Sarvankar यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल)

तसेच आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) तुम्हाला शुभेच्छा दिल्यात असं पत्रकारांनी सांगितल्यानंतर, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, असं अमित ठाकरे म्हणाले. मला माहीम मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत पोहाचायचं आहे, अस देखील अमित ठाकरेंनी म्हटल आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.