J&K Attack: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला!

89
J&K Attack: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला!
J&K Attack: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला!

जम्मू-काश्मीरमधील (J&K Attack) अखनूरमध्ये (Akhnoor) एलओसीजवळ सोमवारी (२८ ऑक्टो.) सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केला. यानंतर लष्कराने परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम राबवली, ज्याचे चकमकीत रूपांतर झाले. सध्या लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे.

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी)

खौरच्या भट्टल भागात असन मंदिराजवळ सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली होती. यानंतर सकाळी 7.25 च्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर 15-20 राउंड गोळीबार केला. मात्र, या हल्ल्यात सैनिक जखमी झाल्याची कोणतीही माहिती नाही. केवळ रुग्णवाहिकेचे नुकसान झाले. (J&K Attack)

(हेही वाचा-Sada Sarvankar उमेदवारी अर्ज भरणार? सोशल मिडीया पोस्ट करत म्हणाले…)

दहशतवादी हल्ल्यानंतर या भागात जवानांची तैनाती वाढवण्यात आली होती. शोध मोहिमेदरम्यान 3 लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू झाला, जो सुरूच आहे. यापूर्वी देखील 24 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले. दोन कुली कामगारांचाही मृत्यू झाला. (J&K Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.