Emerging Asia Cup : भारतानंतर आता अफगाणिस्तानकडून श्रीलंकेचाही पराभव, जिंकला क्रिकेटमधील पहिला चषक

Emerging Asia Cup : अफगाणिस्तान अ संघाने इमर्जिंग आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे.

41
Emerging Asia Cup : भारतानंतर आता अफगाणिस्तानकडून श्रीलंकेचाही पराभव, जिंकला क्रिकेटमधील पहिला चषक
  • ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तानच्या ए संघाने इतिहास रचताना वरिष्ठ गटातील पहिली क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी इमर्जिंग आशिया चषक २०२४ चं विजेतेपद पटकावताना श्रीलंकन ए संघाचा ७ गडी राखून पराभव केला. याआधी अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून मोठा धक्का दिला होता. आता अफगाणिस्तानने अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करून प्रथमच आशिया चषक पटकावला. आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अफगाणिस्तानचा मुख्य संघही दमदार कामगिरी करतोय. त्याचवेळी राष्ट्रीय संघाच्या वाटेवर असलेल्या खेळाडूंनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. (Emerging Asia Cup)

(हेही वाचा – Amit Thackeray यांनी दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा; नेमकं काय म्हणाले ?)

अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य होते. अफगाणिस्तान संघाने १८.१ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर सेदिकुल्लाह अटलने ५५ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. सेदिकुल्लाह अटलने आपल्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार लगावले. तर करीम जन्नतने २७ चेंडूत ३३ धावा केल्या. त्याने आपल्या डावात ३ षटकार टोलावले. दरविश रसूलीने २० चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. तर मोहम्मद इशाक ६ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला. मात्र, याआधी अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. अफगाणिस्तानचा सलामीवीर झुबैद अकबरी एकही धाव न करता बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी डाव सांभाळला. (Emerging Asia Cup)

(हेही वाचा – वरळीत विकासकामे झालेली नाहीत; Amit Thackeray यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा)

श्रीलंकेकडून सहान अरसिंघे, दुशान हेमंथा आणि इशान मलिंगाने प्रत्येकी १ बळी मिळवला. याशिवाय श्रीलंकेच्या इतर गोलंदाजांना यश मिळाले नाही. तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत ७ बाद १३३ धावा केल्या. श्रीलंकेसाठी सहान अरसिंघेने ४७ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार मारले. तर निमेश विमुखीने १९ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. पवन रत्नायकेने २१ चेंडूत २० धावांची खेळी खेळली, याशिवाय श्रीलंकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. तर अफगाणिस्तानकडून बिलाल सामी हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. बिलाल सामीने ४ षटकात २२ धावा देत ३ फलंदाजांना माघारी पाठवले. याशिवाय अल्लाह गझनफरने २ फलंदाजांना बाद केले. (Emerging Asia Cup)

(हेही वाचा – Sada Sarvankar उमेदवारी अर्ज भरणार? सोशल मिडीया पोस्ट करत म्हणाले…)

इमर्जिंग टीम्स आशिया चषकात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने भारताचा पराभव केला आहे. अफगाणिस्तान आणि भारत उपांत्य फेरीचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताचा २० धावांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या पराभवामुळे भारताला चांगलाच धक्का बसला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम खेळताना २०६ धावांची मोठी मजल मारली होती. मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित २० षटकांत केवळ १८६ धावाच करू शकला. रमणदीप सिंगने शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारत ६४ धावांची तुफानी खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. (Emerging Asia Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.