भारतीय जनता पक्षाने (BJP) सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली. २५ उमेदवारांच्या या यादीत वर्सोवामधून भारती लव्हेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर बोरिवली येथून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आतापर्यंत भाजपाने (BJP) १४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आजच्या यादीत विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश करण्यात आला आहे. बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांना यंदा तिकीट नाकारण्यात आले आहे. काटोलमधून इच्छूक आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
(हेही वाचा शरद पवार गटातील गटबाजी चव्हाट्यावर; Jitendra Awhad आणि युनूस शेख यांच्यात माध्यमांसमोर धक्काबुक्की)
तिसऱ्या यादीत कुणाला संधी?
- मूर्तिजापूर – हरिश पिंपळे
- कारंजा – सई प्रकाश डहाके
- तिवसा – राजेश वानखडे
- मोर्शी – उमेश यावलकर
- आर्वी – सुमित वानखेडे
- काटोल – चरणसिंग ठाकूर
- सावनेर – आशिष देशमुख
- नागपूर मध्य – प्रवीण दटके
- नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
- नागपूर उत्तर – मिलिंद मानेसा
- कोली – अविनाश ब्राह्मणकर
- चंद्रपूर – किशोर जोरगेवार
- आर्णी – राजू तोडसाम
- उमरखेड – किशन वानखेडे
- देगळूर – जितेश अंतापूरकर
- डहाणू – विनोद मेढा
- वसई – स्नेहा दुबे
- बोरिवली – संजय उपाध्याय
- वर्सोवा – भारती लव्हेकर
- घाटकोपर पूर्व – पराग शाह
- आष्टी – सुरेश धस
- लातूर शहर – अर्चना पाटील चाकूरकर
- माळशिरस – राम सातपुते
- कराड उत्तर – मनोज घोरपडे
- पलूस कडेगाव – संग्राम देशमुख
Join Our WhatsApp Community