Crime : लघुशंका केली म्हणून प्रेयसीच्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या, प्रियकराला अटक

85
Crime : लघुशंका केली म्हणून प्रेयसीच्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या, प्रियकराला अटक
  • प्रतिनिधी 

चड्डीत लघवी केली म्हणून विवाहित प्रेयसीच्या ४ वर्षाच्या मुलाला १९ वर्षीय प्रियकराने केलेल्या बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कुर्ला पूर्व येथे रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Crime)

रितेश कुमार अजय चंद्रवंशी (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुर्ला पूर्व साबळे नगर येथील पत्रा चाळीत रितेश कुमार हा विवाहित प्रेयसीसोबत राहण्यास होता. २३ वर्षीय प्रेयसी ही पतीपासून विभक्त राहत होती, तिला पतीपासून ६ वर्षाची मुलगी आणि ४ वर्षाचा मुलगा अशी दोन मुले होती. तक्रारदार विवाहिता ही पटणा येथे मुलासोबत फिरण्यासाठी गेली असता तिची सलगी तिचा मामाचा मुलगा रितेशकुमार सोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन, त्यानंतर दोघे दोन्ही मुलांसह मुंबईत आले आणि दोघे मुलांसह कुर्ला पूर्व साबळे नगर येथे भाडेतत्त्वावर खोली घेऊन एकत्र राहू लागले. (Crime)

(हेही वाचा – थांबा, विचार करा आणि मग कृती करा; Digital Arrest विषयी पंतप्रधानांनी केली जागृती)

२६ ऑक्टोबर रोजी तक्रारदार विवाहिता दोन्ही मुलांना प्रियकरासोबत सोडून घरकाम करण्यासाठी गेली होती. दरम्यान ४ वर्षाचा बळीत मुलाला लघवी आली म्हणून त्याने चड्डीत लघवी केल्याचा रागातून रितेशने त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या पोटात लाथेने मारल्यामुळे त्याला उलट्या झाल्या, आई घरी आल्यावर मुलाने आईकडे रितेश कुमार याने मारहाण केल्याची तक्रार केली, व जोरजोरात रडू लागला. त्याला उलट्या होऊन पोटात दुखू लागल्याने त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला औषध देऊन पाठवले. त्यानंतर तक्रारदार महिलेने रितेशला याबाबत जाब विचारला असता तो गुपचूप घरातून बाहेर निघून गेला. (Crime)

रात्रभर मुलगा पोटात दुखत असल्याचे सांगत होता, त्याला अचानक उलट्या सुरू झाल्यामुळे त्याला तात्काळ राजावाडी रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी तात्काळ सायन रुग्णालयात जाण्यास सांगितले. सायन रुग्णालयात मुलाला आणले असता डॉक्टरांनी मुलाला तपासून दाखल करून घेतले, दरम्यान रविवारी मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रितेश कुमार याचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.