तेलंगणातील ७५० एकर जमिनीवर Waqf Boardचा दावा; स्थानिक नागरिकांमध्ये संताप

40
तेलंगणातील ७५० एकर जमिनीवर Waqf Boardचा दावा; स्थानिक नागरिकांमध्ये संताप
तेलंगणातील ७५० एकर जमिनीवर Waqf Boardचा दावा; स्थानिक नागरिकांमध्ये संताप

तेलंगणामधील (Telangana) मलकाजगिरी येथील ७५० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केल्याने त्यांचे देशभर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान स्थानिकांकडून जमीन बळकावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेकजण वक्फ बोर्डाचा (Waqf Board) दावा बेकायदेशीर असल्याचे सांगत, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या जमिनीवर दावा त्यांनी जमिनी खरेदी केल्यानंतर दशकांनंतर केला आहे. स्थानिक रहिवासी रमेश म्हणाले की, “वक्फ बोर्ड (Waqf Board) आमची कष्टाने कमावलेली मालमत्ता कोणत्याही वैध कारणाशिवाय हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे.”

( हेही वाचा : थांबा, विचार करा आणि मग कृती करा; Digital Arrest विषयी पंतप्रधानांनी केली जागृती

मलकाजगिरी सब-रजिस्ट्रार, श्रीकांत यांनी या जमिनी वक्फ मालमत्ता म्हणून नियुक्त केल्याची घोषणा राज्य नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या आदेशानुसार केली. श्रीकांत यांच्यावर पारदर्शकता किंवा सल्लामसलत न करता काम केल्याचा आरोप आहे. यापूर्वी आयुक्त आणि नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षकांनी मलकाजगिरी येथील जिल्हा निबंधक कार्यालयाला निषिद्ध यादीत नमूद केलेल्या जमिनींचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते.(Waqf Board)

वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केलेल्या ७५० एकरमध्ये पूर्व काकतिया नगर, जुना सफिलगुडा, न्यू विद्यानगर, राम ब्रह्मा नगर,मौलाली, आरटीसी कॉलनी, शफी नगर आणि तिरुमला नगर, भारत नगर, एनबीएच कॉलनी, श्री कृष्णा नगर, सीताराम नगर आदी भाग येतात. वक्फ बोर्डाच्या कारवाईविरोधात स्थानिक नेते पुढे सरसावत, स्थानिकांना जागृत करत वक्फच्या (Waqf Board) अन्यायकारक जमीन बळकावण्याच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी रॅली काढण्यासाठी आवाहन करत आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.