Delhi Marathi Pratishthan Diwali Pahat : स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरांनी दिल्लीकर मंत्रमुग्ध

64
Delhi Marathi Pratishthan Diwali Pahat : स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरांनी दिल्लीकर मंत्रमुग्ध
  • प्रतिनिधी 

नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील भव्य सेंट्रल पार्कमध्ये गायक स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरांनी मंत्रमुग्ध होण्याचा अनुभव दिल्लीकर मराठीजनांनी रविवारी घेतला. देशाची राजधानी नवी दिल्लीत सालबादाप्रमाणे यंदाही दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे “दिवाळी पहाट” चे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे नववे वर्ष होते. यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध मराठी गायक स्वप्निल बांदोडकर यांनी दिल्लीकरांना सुरेल मेजवानी दिली. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध निवेदिका आणि व्हॉईसओव्हर आर्टिस्ट मेघना एरंडे-जोशी, गायिका सावनी रवींद्र, ईशानी पाटणकर आणि स्वप्निल गोडबोले यांनीही दिल्लीकर मराठीजनांना सांस्कृतिक मेजवानी दिली. (Delhi Marathi Pratishthan Diwali Pahat)

(हेही वाचा – Sharad Pawar गटाकडून चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या सुपूत्राला उमेदवारी)

पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते गायक स्वप्निल बांदोडकर यांचे “राधा ही बावरी” आणि “गालावर खळी” ही गीते. ही गाणी सादर होत असताना उपस्थितांनाही स्वप्निल बांदोडकर यांना साथ देण्याचा मोह आवरला नाही. त्याचप्रमाणे सावनी रवींद्र यांनी “गोऱ्या गोऱ्या गालावरी” या गाण्याने उपस्थित दंग झाले. ईशानी पाटणकर यांचे “मला वेड लागले” तर स्वप्निल गोडबोले यांचे “माय भवानी” या गाण्याने उपस्थित भारावले. कार्यक्रमाचा शेवट “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाला. (Delhi Marathi Pratishthan Diwali Pahat)

(हेही वाचा – Hoax Call : भारतीय विमान कंपन्यांच्या ५० विमानांना बॉम्बच्या धमक्या)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

केंद्र सरकारने मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्यात आला आहे. त्याविषयी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करणारे पत्र उपस्थित हजारो मराठीजनांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आले. (Delhi Marathi Pratishthan Diwali Pahat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.