Maharashtra Assembly Poll : युगेंद्र पवार : ५० लाख उत्पन्न; पाच वर्षात ५० कोटी!

74
Maharashtra Assembly Poll : युगेंद्र पवार : ५० लाख उत्पन्न; पाच वर्षात ५० कोटी!
  • सुजित महामुलकर

राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांचे नातू आणि महाविकास आघाडीचे बारामती मतदारसंघातील उमेदवार ३३-वर्षीय युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांची मालमत्ता किती असेल? राजकारणात आल्यानंतर मालमत्ता दिवसागणिक प्रचंड वेगाने वाढत असल्याने लोकांना या राजकारणाचे अप्रूप वाटणे स्वाभाविक आहे.

सर्वसामान्याला लाखाचे कोटी करण्यात संपूर्ण आयुष्य वेचावे लागते, पण राजकारणात लाखाचे कोटीत जायला काही दिवसांचा कालावधीही पुरेसा असतो, हे काही उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Hoax Call : भारतीय विमान कंपन्यांच्या ५० विमानांना बॉम्बच्या धमक्या)

उत्पन्न २०१९-२० मध्ये ४९.८१ लाख

बारामतीत नवीन उदयास आलेले राजकारणी युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात लक्षणीय पटीत वाढली असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येत आहे. युगेंद्र यांचे उत्पन्न २०१९-२० मध्ये ४९.८१ लाख रुपये म्हणजे जवळपास ५० लाख असल्याचे त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यापुढील पाच वर्षात त्यांची मालमत्ता किती आणि कशी झाली? हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे.

उत्पन्न २०२४-२५ मध्ये ५० कोटी

सोमवारी (२८ ऑक्टोबर) युगेंद्र (Yugendra Pawar) यांनी आपली मालमत्ता ५० कोटी रुपये किमतीची असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यात जंगम मालमत्ता ३९.७९ कोटी इतक्या किमतीची असून अचल मालमत्ता १०.७९ कोटी रुपये आहे. बँकेतील ठेवी आणि सहकारी संस्थांमधील ठेवी २.९३ कोटी रुपये असून विविध बॉन्ड, शेअर्समध्ये ३१.८२ कोटी रुपये १.०७ कोटी किमतीच्या गाड्या आहेत. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : भायखळा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी)

मुळशी-बारामती प्लॉट; मुंबईत फ्लॅट

अचल संपत्तीत मुळशी आणि बारामती तालुक्यात काही प्लॉट्स असून मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत नेपियन सी रोड येथे २,०५० चौ फूटाचा एक फ्लॅट आहे, अशी १० कोटीची मालमत्ता असल्याची माहिती युगेंद्र (Yugendra Pawar) यांनी दिली आहे.

सुप्रिया आत्यापेक्षा श्रीमंत

विशेष म्हणजे युगेंद्र यांच्या आत्या आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांचीही मालमत्ता ५० कोटी नाही. सुप्रिया यांनी मे २०२४ ला लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा प्रतिज्ञापत्रात त्यांनी याबाबतची माहिती उघड केली आहे, त्यानुसार त्यांची मालमत्ता ३८ कोटी रुपये आहे. तर शरद पवार यांनी २०२० मध्ये एका प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता जाहीर केली ती ३२ कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे.

२०२३-२४ या वर्षाचे आयकर विवरण पत्रानुसार उत्पन्न युगेंद्र (Yugendra Pawar) यांचे उत्पन्न ३.४१ कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे, तर २०२४-२५ मधील त्यांची ५० कोटीची मालमत्ता लक्षवेधी आहे. युगेंद्र यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.