India vs NZ, 3rd Test : टी२०, एकदिवसीय आणि कसोटीतही गौतम गंभीरची अपयशाने सुरुवात

India vs NZ, 3rd Test : गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघाचं हे तिसरं अपयश आहे.

42
India vs NZ, 3rd Test : टी२०, एकदिवसीय आणि कसोटीतही गौतम गंभीरची अपयशाने सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषक संपल्यानंतर राहुल द्रविडचा भारतीय मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याने संघाची धुरा आपल्या हातात घेतली. त्याच्या प्रशिक्षणाखालील भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास उतार चढावांचा आहे. गेल्या ३६ वर्षात भारतात एकही कसोटी जिंकू न शकलेल्या किवी संघाने घरच्या मैदानावर भारताचा पराभव केला. त्याचबरोबर भारतीय संघाची मायदेशात सलग १८ मालिका जिंकण्याची मालिका संपुष्टात आणली. तर १२ वर्षांनंतर भारताने मायदेशात एखादी मालिका गमावली. (India vs NZ, 3rd Test)

रोहित शर्मा आणि गौतम गंभीरसाठी आगामी काही आठवडे या पराभवाचे आकलन नक्की करतील, पण गंभीरच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाची ही दुसरी खराब कामगिरी आहे. गंभीर प्रशिक्षक म्हणून आपली पहिली मालिका खेळला ती श्रीलंकेविरुद्ध. संघाने येथे टी-२० मालिका क्लीन स्वीप करण्यात यश मिळवले, परंतु वनडे मालिका ०-२ ने गमावली. २७ वर्षांनंतर श्रीलंकेने भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली. गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाचे हे पहिले अपयश होते. (India vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : भायखळा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी)

श्रीलंका दौऱ्यानंतर भारताला बांगलादेशविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची होती. भारताने बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत आणि ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केला. पण न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव झाला. आणि न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारताविरुद्ध पहिला विजय मिळवला. (India vs NZ, 3rd Test)

न्यूझीलंडने मालिका २-० अशी खिशात घातली आहे. १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. अशाप्रकारे पाहिले तर गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताने २७ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली. त्यानंतर २६ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी गमावली आणि १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. (India vs NZ, 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.