- सचिन धानजी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जात असून आतापर्यंत विविध पक्षांकडून मुंबई महापालिकेचे तब्बल १६ माजी नगरसेवक हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीच्यावतीने १० माजी नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले असून त्यात उबाठा शिवसेनेच्या ०८ उमेदवारांचा सामावेश आहे. (Assembly Election 2024)
शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आणि उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्ष यांच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा जसा सुटला जात आहे त्याप्रमाणे उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत मुंबई महापालिकेचे १६ माजी नगरसेवका हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये शिवसेना ०२, भाजपा ०१, उबाठा शिवसेना ०८, काँग्रेस ०१, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ०१, आणि मनसे ०३ अशाप्रकारे विविध पक्षांनी माजी नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. मागील विधानसभेमध्ये यामिनी जाधव, दिलीप लांडे, रमेश कोरगावकर तसेच रईस शेख हे नगरसेवक आमदार बनले होते. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : युगेंद्र पवार : ५० लाख उत्पन्न; पाच वर्षात ५० कोटी!)
महायुती (०३)
शिवसेना (०२) : मुरजी पटेल, सुवर्णा करंजे
भाजपा (०१) : विनोद शेलार,
महाविकास आघाडी (१०)
उबाठा शिवसेना (०८) : मनोज जामसुतकर, श्रद्धा जाधव, प्रविणा मोरजकर, संदीप नाईक, समीर देसाई, बाळा नर, उदेश पाटेकर, संजय भालेराव
काँग्रेस (०१) : आसिफ झकेरिया
राष्ट्रवादी काँग्रेस (०१) : राखी जाधव
मनसे (०३) : संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, भालचंद्र आंबुरे
हेही पहा –
Join Our WhatsApp Community