विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून Swapna Patkar अपक्ष लढणार

कोर्ट कचेरीनंतर आता निवडणुकीतून सुनील राऊत यांना देणार आव्हान

63
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून Swapna Patkar अपक्ष लढणार
  • प्रतिनिधी

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे डोकेदुखी वाढवणाऱ्या डॉ. स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) आता विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. विद्यमान आमदार सुनील राऊत यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवणार असल्याने राऊतांपुढे त्यांचे आव्हान असणार आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : युगेंद्र पवार : ५० लाख उत्पन्न; पाच वर्षात ५० कोटी!)

विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या काही उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. विक्रोळी मतदारसंघातून डॉ. पाटकर (Swapna Patkar) या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. पत्राचाळ प्रकरणात पाटकर यांनी केलेल्या आरोपामुळे ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. राऊत आणि पाटकर यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. आता विधानसभा निवडणुकीत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. राऊत यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेकडून सुवर्णा कारंजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पाटकर या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरल्याने चांगलीच रंगत येणार आहे.

(हेही वाचा – दिवाळीत Ayodhya नगरीत घडणार नवा विक्रम; २८ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या)

सत्यमेव जयते! स्त्री दुर्गा असते लक्ष्मी असते. तिचा सन्मान करता येत नाही, त्यांना आयुष्यात काहीच नीट करता येत नाही. लोकशाही आणि न्यायालयावर माझा प्रचंड विश्वास आहे. लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या महोत्सवात विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेणार आहे. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, शासन-प्रशासनाबाबत रोज भोंगे वाजवणारे लोक स्वतः कुपमंडूक वृत्तीचे आहेत. महिलांचा सन्मान आणि त्यांची सुरक्षितता यावर त्यांची अत्यंत गंभीर मते आहेत. मात्र प्रत्यक्षात एका महिलेचे शोषण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे अत्याचाराच्या धमक्या देणाऱ्या घाबरट आणि पळकुट्या लोकांशी आता मी थेट दोन हात करणार आहे, असा सूचक इशारा पाटकर (Swapna Patkar) यांनी राऊत बंधूंना दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.