Amit Thackeray यांनी दिली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट

32
Amit Thackeray यांनी दिली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट
Amit Thackeray यांनी दिली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी २८ ऑक्टोबरला माहिम विधानसभेसाठी अर्ज भरल्यानंतर सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यावेळी अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. यावेळी मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar), दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर परब (Bhaskar Parab) आणि अन्य मनसैनिकही उपस्थित होते.

( हेही वाचा : Hyderabad Fire : बेकायदेशीर फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; एक महिला जखमी

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा आणि ‘हिंदुत्व’ हे पुस्तक भेट दिले. यावेळी स्मारकाचे कार्यकारी सदस्य दीपक कानुलकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य संतोष कारकरही उपस्थित होते.

२८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर ‘सिंघम’ चित्रपटाच्या टीमने मनसैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जोरदार आतषबाजी करत शक्तीप्रदर्शनही करण्यात आले.(Amit Thackeray)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.