मधुबनी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ मध्ये दरभंगा जिल्ह्याचे विभाजन करून मधुबनी हा जिल्हा बनला. मधुबनी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून मधुबनी येथे त्याचे मुख्यालय आहे. २०११ साली मधुबनी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४५ लाख होती. मधुबनी हा भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी एक असून ह्या जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे. (Madhubani)(Madhubani Painting)
(हेही वाचा : BMC Hospital : रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि तळमळीने काम करावे!, आयुक्तांचा प्रेमाचा सल्ला)
बळीराजगड , एक पुरातत्व स्थळ जे आधुनिक काळातील मधुबनी जिल्ह्यात आहे, ही प्राचीन मिथिला राज्याची राजधानी होती. गावातील एका शेतात एक उल्का पडली ज्याला विद्वानांनी भारतातील मधुबनी जिल्ह्यातील महादेव उल्का असे नाव दिले. मधुबनी चित्रशैली ह्या जगप्रसिद्ध चित्रकलेचा उगम मधुबनी परिसरामध्येच झाला. आजच्या घडीला मधुबनी चित्रांची विक्री व निर्यात हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे. राष्ट्रीय महामार्ग २७ हा येथून धावणारा प्रमुख महामार्ग आहे. जयनगर हे भारत-नेपाळ सीमेजवळील एक नगर रेल्वेचे टर्मिनस आहे.(Madhubani) (Madhubani Painting)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community