What is Muhurat Trading : शेअर बाजारातील मूहूर्ताचं ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? मूहूर्त ट्रेडिंगविषयी सर्व काही

यंदा मूहूर्ताचं ट्रेडिंग १ नोव्हेंबरला होणार आहे.

78
What is Muhurat Trading : शेअर बाजारातील मूहूर्ताचं ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? मूहूर्त ट्रेडिंगविषयी सर्व काही
What is Muhurat Trading : शेअर बाजारातील मूहूर्ताचं ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? मूहूर्त ट्रेडिंगविषयी सर्व काही
  • ऋजुता लुकतुके

दिवाळी हा देशभरात साजरा होणारा सण आहे. आणि हिंदू दिनदर्शिकेत या सणाला अतिशय महत्त्व आहे. अंधारावर प्रकाशाची आणि वाईटावर चांगल्याची मात असं प्रतीक असलेला हा सण आहे. आणि या सणाला एखाद्या नवीन गोष्टीचा पवित्र प्रारंभ व्हावा असा संकेत आहे. तसंच हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन संवत्सरही लक्ष्मीपूजनाला सुरू होतं. आणि ते औचित्य साधून नवीन वर्षाचा शुभारंभ अशा मूहूर्ताच्या ट्रेडिंगने (Muhurat Trading) करण्याचा प्रघात सुरू झाला.

एखाद्या शुभ मूहूर्तावर चांगल्या गोष्टीची सुरुवात व्हावी अशा समजातून वर्षाचा नवीन आणि पहिला सौदा या दिवशी गुंतवणूकदार सुरू करतात. दरवर्षी राष्ट्रीय शेअर बाजार तसंच बाँबे स्टॉक एक्सचेंज हे महत्त्वाचे दोन शेअर बाजार आणि इतरही शेअर बाजारांमध्ये १ तास ठरवून त्याप्रमाणे मूहूर्ताचं ट्रेडिंग पार पडतं. मूहूर्ताचं ट्रेडिंग (Muhurat Trading) हे भारतीय शेअर बाजारांचं खास वैशिष्ट्य आहे. ही पद्धत जगात इतर कुठेही नाही.

यंदा १ नोव्हेंबरला मूहूर्ताचं ट्रेडिंग (Muhurat Trading) होणार आहे. संध्याकाळी ६ ते ७ या कालावधीत मूहूर्ताचं ट्रेडिंग पार पडणार आहे. आणि त्यापूर्वी १५ मिनिटांचं प्रीट्रेडिंग सत्र नेहमीप्रमाणे पार पडेल. टी प्लस वन सेटलमेंट असल्यामुळे त्या दिवशी झालेले व्यवहार पुढील दिवशीच पूर्ण होतील.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले १६ माजी नगरसेवक)

WhatsApp Image 2024 10 29 at 7.31.26 AM

भारतात मूहूर्ताच्या ट्रेडिंगची (Muhurat Trading) मोठी परंपरा आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला नवीन संवत्सर सुरू होत असल्यामुळे देशातील व्यापारी वर्ग या दिवशी आपलं नवीन व्यापारी वर्षं सुरू करतात. आणि आपली जुनी हिशोबाची वही बाजूला ठेवून नवीन वही सुरू करतात. त्या समारंभाला चोपडी पूजन म्हटलं जातं. हिशोबाच्या वह्या पूजण्याबरोबरच लक्ष्मी पूजनही करण्याची पद्धत आहे. पैसे, मालमत्ता म्हणजे लक्ष्मी. आणि तिचं पूजन या दिवशी केलं जातं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.