Maharashtra Assembly Election 2024 : भाजप+ १५०; काँग्रेस १००+, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेही ८० उमेदवार घोषित

129
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप+ १५०; काँग्रेस १००+, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेही ८० उमेदवार घोषित; कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा ?
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप+ १५०; काँग्रेस १००+, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेही ८० उमेदवार घोषित; कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा ?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) २५, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने (Shivsena) १५, तर काँग्रेसने (Congress) ४ उमेदवारांची यादी सोमवार, २९ ऑक्टोबर रोजी जाहीर केली. भाजपने आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर करीत ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. यासह भाजपकडून आतापर्यंत १५० उमेदवार घोषित करण्यात आले आहेत, तर काँग्रेसही १०२ जागांवर पोहोचली आहे. मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आजच्या यादीसह एकूण ८० उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यात काही भाजप नेत्यांनाही संधी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे PM Narendra Modi आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते उद्धाटन)

भाजपने बडनेराची जागा युवा स्वाभिमानीला, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना; मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला, तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य पार्टीला सोडली आहे. बडनेरामध्ये रवि राणा, गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे, तर शाहुवाडीत विनय कोरे हे उमेदवार असतील.

भाजपच्या १४६ उमेदवारांमध्ये ९३ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. वसईमधून उमेदवारी मिळालेल्या स्नेहा दुबे या माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या कन्या आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार हे २०१९ मध्ये औसामधून लढले आणि जिंकले होते. आता फडणवीस यांचे सहा महिने पूर्वीपर्यंत पीए असलेले सुमित वानखेडे यांना आर्वीतून (जि. वर्धा) उमेदवारी देण्यात आली आहे. आर्वीमध्ये शरद पवार गटाने वर्धेचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी दिली आहे.

माजी आमदार दिवंगत रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जितेश काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढले आणि जिंकले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ‘भाजप’मध्ये प्रवेश केला. ‘भाजप’ने त्यांना देगलूरमध्ये उमेदवारी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.