देशभरात दिवाळीच्या सणाची जोरदार तयारी सुरु असतांना केरळच्या कासारगोडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान फटाक्यांनी भरलेल्या खोलीत मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (Kerala Temple Accident)
(हेही वाचा – आत्महत्येचा इशारा देणारे पालघरचे विद्यमान आमदार Srinivas Vanga ‘नॉट रिचेबल’)
केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरम येथे सोमवार, २८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. अंजुतांबलम वीरकावू मंदिरात ही दुर्घटना घडली. इथे मंदिरात वार्षिक कलियाट्टम उत्सव साजरा केला जातो. कार्यक्रमासाठी फटाक्यांची मोठी ऑर्डर देण्यात आली होती. सर्व फटाके एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले होते.
रात्री १२.३० वाजता अचानक फटाके फुटू लागले आणि काही वेळातच धुराचे लोळ दिसू लागले. फटाक्यांना आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटामुळे १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. (Kerala Temple Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community