MSRTC : प्रवाशांसाठी खुशखबर! आता फोनवरच मिळणार ‘एसटी’ बसची माहिती, जाणून घ्या नंबर

206
MSRTC : प्रवाशांसाठी खुशखबर! आता फोनवरच मिळणार ‘एसटी’ बसची माहिती, जाणून घ्या नंबर
MSRTC : प्रवाशांसाठी खुशखबर! आता फोनवरच मिळणार ‘एसटी’ बसची माहिती, जाणून घ्या नंबर

महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी बसमधून (ST Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. शहरापासून खेड्या-पाड्यात जाणाऱ्या बस गाड्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. कारण, पुणे एसटी प्रशासनाने (Pune ST Administration) ९० पर्यवेक्षकांचा मोबाईल क्रमांक प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. शिवाय एसटीचे ठिकाण समजण्यासाठीही व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध केला आहे. त्यावर बसविषयी संदेश पाठविल्यावर पाच मिनिटांत प्रवाशांना माहिती मिळेल, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाचे नियंत्रक प्रमोद नेहूल (Pune Division Controller Pramod Nehul) यांनी दिली. सध्या राज्य मार्ग परिवहन पुणे विभागाने महामंडळाच्या स्वारगेट, वाकडेवाडीसारख्या प्रमुख बसस्थानकांवर सुविधा उपलब्ध केली आहे. (MSRTC)

आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी ते ज्या शहरात जाणार आहेत, तेथील बसस्थानकाच्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक दिला आहे. स्वारगेटहून प्रवासी सोलापूरला जाणार असेल अथवा वाकडेवाडीहून प्रवासी अमरावतीला जात असेल, त्यांच्यासाठी त्याच शहरात बसस्थानकावर नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्याचा क्रमांक एसटीने जाहीर केला आहे. त्यामुळे आरक्षण केलेली एसटी सध्या कुठे आहे, किती वाजता स्थानकावर येईल, आदी माहिती कर्मचारी प्रवाशांना देत आहे.

(हेही वाचा –Maharashtra Assembly Election 2024 : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; महायुतीच्या ९, तर महाविकास आघाडीच्या २१ जागांचा पेच कायम )

या क्रमांकावर मिळणार माहिती

प्रवाशांना गाडीविषयी माहिती मिळण्यासाठी प्रशासनाने 8766054235 हा क्रमांक सुरू केला आहे. त्यावर प्रवाशांनी गाडीच्या माहितीचा संदेश पाठविल्यावर काही मिनिटांत संदेशाला उत्तर दिले जाईल. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या गाडीची माहिती मिळण्यास मदत होईल.


हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.