Assembly Elections 2024 : ऐरोली विधानसभा मतदारसंघांत पाच लाख रोख रक्कम जप्त

76
Assembly Elections 2024 : ऐरोली विधानसभा मतदारसंघांत पाच लाख रोख रक्कम जप्त
Assembly Elections 2024 : ऐरोली विधानसभा मतदारसंघांत पाच लाख रोख रक्कम जप्त

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. 150 ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात भरारी पथक क्रमांक एस.एस.टी 7 यांनी शीळ पोलीस चौकी चेक पोस्ट येथे शीळमार्गे बदलापूर येथून आलेल्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये पाच लाख रुपयांची रोकड आढळून आली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly 2024 : भाजपाची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट)

याबाबत या गाडीचे वाहनचालक शैलेश बसप्पा तलवार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गाडीत सापडलेली रक्कम त्यांचे मित्र विक्रम स्वामी यांनी गिफ्ट आणण्याकरिता दिल्याचे सांगितले. विक्रम स्वामी यांचा मेसर्स इनफिनिट कन्स्ट्रक्शन या नावाने रियल इस्टेटचा व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनचालक शैलेश तलवार हे फेअर एक्सपोर्ट प्रा.लि. वाशी येथे संचालक असून त्यांना विक्रम स्वामी यांनी गिफ्ट आणण्यासाठी रोख रक्कम दिल्याचे सांगितले. परंतू वाहनचालक शैलेश तलवार यांना याबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाही. (Assembly Elections 2024)

(हेही वाचा – बोरिवलीत भाजपामध्ये उमेदवारीवरून तणाव; Gopal Shetty बंडखोरी करणार)

या गाडीत आढळून आलेली पाच लाखाची रोख रक्कम भरारी पथकाने कार्यालयात सीलबंद केली असून याबाबत अधिक तपासणी करण्यासाठी महसूल सहायक तुकाराम गवळी यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांना कळविले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.