- ऋजुता लुकतुके
वन प्लस १२ आणि वन प्लस १२ आर हे दोन बहुचर्चित फोन नंतर आता कंपनीने भारतात १२ मालिकेतील नवा फोन १२ टी लाँच केला आहे. चीनमध्ये काही दिवसांपूर्वी या फोनबद्दल विबो या तिथल्या सोशल मीडियावर लिहून आलं होतं. त्यामुळे हा फोन नेमका कसा आहे आणि त्याची किंमत काय याचा नेमका अंदाज बांधता येऊ शकतो. वन प्लस १२ हा प्राथमिक फोन १२ जीबी रॅमचा असेल. त्याची किंमत ही ६४,९९९ रुपये इतकी असेल. तर १६ जीबी रॅमचा वन प्लस १२ आर हा फोन ६९,९९९ रुपयांना मिळेल. (OnePlus 12T)
स्नॅपड्रॅगन ८ प्रणालीवर आधारित या फोनचं खास वैशिष्ट्य असेल ती ५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी. तर १०० डब्ल्यू क्षमतेचा चार्जरही जलद चार्जिंगसाठी उपयुक्त आहे. वन प्लस १२ सीरिज चिनी बाजारपेठेत यापूर्वीच आला आहे. त्यामुळे फोनविषयी इतर माहितीही आता उपलब्ध आहे. फोनचा डिस्प्ले ६.८२ इंचांचा असेल. तर रिफ्रेश रेट १२०० हर्ट्झचा असेल. हा फोन अत्यंत स्पष्ट चित्रासाठी ओळखला जाईल. (OnePlus 12T)
Get ready! The all-new #OxygenOS15 launches tomorrow, and to celebrate, we’re giving away OnePlus 12, OnePlus Buds Pro 3, and OnePlus Never Settle Hoodies! Don’t miss out!
Join the celebration here: https://t.co/PFLosaWe24
Catch the launch on Oct 24, 9PM IST!#OOS15 pic.twitter.com/2O0NYVZo2t— OnePlus India (@OnePlus_IN) October 23, 2024
(हेही वाचा – Bomb Threat : राममंदिर, महाकाल मंदिर आणि तिरुपती मंदिराला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा झाल्या सतर्क)
या फोनची स्टोरेज क्षमता २५६ जीबी आणि ५१२ जीबी इतकी असेल. या फोनचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा असेल. तर टेलिफोटो लेन्स ६४ मेगापिक्सेलची आणि अल्ट्रावाईड लेन्स ४८ मेगापिक्सेलची आहे. तर 2x ऑप्टिकल झूमची सोय यात आहे. वन प्लस १२ सीरिज बरोबरच कंपनीने जागतिक स्तरावर इयरबड्सही लाँच करण्याचं ठरवलं आहे. (OnePlus 12T)
हे इयरबड्स एकदा चार्ज केल्यावर ४४ तास चालतील. ब्लूटूथ कम्पॅटेबिलिटी ५.३ इतकी आहे. या इयरबड्समधील आवाजाचा दर्जा अत्युत्तम असेल असा कंपनीचा दावा आहे. (OnePlus 12T)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community