- ऋजुता लुकतुके
विवो कंपनीने यावर्षी आपले एक्स मालिकेतील फोन यापूर्वीच भारतीय बाजारपेठेत आणले आहेत. आता दिवाळीच्या मूहर्तावर कंपनी वाय मालिकेतील किफायतशीर फोन बाजारात आणणार आहे. त्यातलाच एक असेल वाय३०० हा मोबाईल फोन. २२,५०० ते २७,५०० रुपयांमध्ये हे फोन ग्राहकांना मिळणार आहेत. (Vivo Y300 Series)
विवो वाय ३०० सीरिज ही स्नॅपड्रॅगन फोरच्या चौथ्या पिढीतील प्रोसेसरवर आधारित आहे. मीडियाटेक कंपनीचा हा पहिला मोठा फ्लॅगशिप मोबाईल सीपीयू आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ शी स्पर्धा करणारा हा चिपसेट आहे. फोनचा डिस्प्ले एमोल्ड आणि ६.७ इंचांचा आहे आणि त्याची प्रखरता ३,००० नीट्सची आहे. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीचं सगळ्यात जास्त स्टोरेज असलेला हा फोन असेल. (Vivo Y300 Series)
Vivo’s first Micro Quad Curved Display Smartphone is actually not the Vivo X200 Pro but Vivo Y300 Pro and it looks stunning pic.twitter.com/tvQlV5TrvF
— Kartikey Singh (@That_Kartikey) August 28, 2024
(हेही वाचा – OnePlus 12T : वन प्लस १२ सीरिजमधील फोनची किंमत, वैशिष्ट्ये आणि बॅटरीचं आयुष्य याविषयी जाणून घेऊया)
फोनच्या मागच्या बाजूला असलेला कॅमेरा आयलंड देखणा आणि आकर्षक आहे. यात आहे इथं आहे ५० मेगापिक्सलचा सोनी सेन्सर आणि झाईसची ६४ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स. बरोबरीने या आयलंडवर आहे ५० मेगा पिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा. (Vivo Y300 Series)
५००० एमएएच क्षमतेची तगडी बॅटरी या फोनमध्ये असेल आणि १०० वॅटचं फास्ट चार्जिंगही यात उपलब्ध असेल. भारतात अजून हा फोन लाँच झालेला नाही. त्यामुळे नेमकी किंमत अजून जाहीर झालेली नाही. पण, सुरुवातीचं मॉडेल हे २२,५०० रुपयांपासून उपलब्ध असेल. (Vivo Y300 Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community