- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सलग दुसऱ्या कसोटी पराभवानंतर भारतीय संघाने मालिका तर गमावलीच. शिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत मिळालेल्या यशाला काहीसं खिंडार पडलं आहे. शिवाय पराभव मायदेशातील मालिकेत झाल्यामुले पुढील आव्हान खडतर झालं आहे. याउलट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांना मायदेशातील मालिकांमुळे नवीन उत्साह संचारला असेल. खरं चित्र भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकांनंतरच स्पष्ट होईल. (ICC Test Championship)
पण, अलीकडे लागलेल्या काही धक्कादायक निकालांमुळे चित्र असं आहे की, अगदी पाकिस्तान आणि तळाच्या वेस्ट इंडिजलाही पुढे चाल मिळण्याच्या अंधुक का होईना शक्यता निर्माण झाल्या आहेत. अर्थात, खरी चुरस भारत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच आहे. भारतीय संघ सध्या ६२.८२ टक्के यशासह पहिल्या क्रमांकावर आहे. पण, दुसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलिया संघही ६२.५० अशा टक्केवारीसह फारसा मागे नाही. तर चौथा संघ असलेल्या न्यूझीलंडची यशाची टक्केवारी आहे ५० टक्के आणि मध्ये श्रीलंकन संघ तिसऱ्या स्थानावर आहे. (ICC Test Championship)
(हेही वाचा – Trupti Sawant यांचा मनसेत प्रवेश, भाजपाला धक्का )
भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाला असला तरी मालिकेतील १ कसोटी आणि ऑस्ट्रेलियातील ५ कसोटी अजून बाकी आहेत. ते धरता भारतीय संघ हंगामाच्या शेवटी जास्तीत जास्त ७४.५६ टक्के गुण मिळवू शकतो. तर ऑस्ट्रेलियन संघाने उर्वरित ७ पैकी ४ कसोटी जिंकल्या तर त्यांची यशाची टक्केवारी ६५.५० टक्के होईल. त्यांनाही अंतिम फेरीची चांगली संधी असेल. श्रीलंकन संघासमोर इथून पुढचं आव्हान आहे ते दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचं. तर न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे आणि ही लढत घरच्या मैदानावर होणार आहे. त्यामुळे त्यांना काहीशी संधी आहे. पण, त्यासाठी उर्वरित ४ कसोटींपैकी सर्वच्या सर्व त्यांना जिंकाव्या लागतील. (ICC Test Championship)
दक्षिण आफ्रिकेला बांगलादेश सोडलं तर श्रीलंका आणि पाकिस्तानशी मायदेशात मालिका खेळायच्या आहेत. तो फायदा त्यांना मिळू शकतो. बाकी पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे संघ गणिताने अजून बाद झाले नसले तरी त्यांच्यासमोरचं आव्हान खूपच मोठं आहे. भारतीय संघाला अंतिम फेरीसाठी उर्वरित ६ कसोटींपैकी किमान ३ जिंकाव्या लागतील. तर अंतिम फेरीची आशा त्यांना धरता येईल. आता प्रमुख संघांचे किती आणि कुठे सामने बाकी आहेत ते पाहूया, (ICC Test Championship)
(हेही वाचा – विद्यार्थ्यांना आर्य-द्रविड सिद्धांत शिकवण्याविषयी विचार करा; Madras High Court चे निर्देश)
भारत – १ कसोटी वि. न्यूझीलंड (मायदेशात), ५ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलियात)
ऑस्ट्रेलिया – ५ कसोटी वि. भारत (मायदेशात), २ कसोटी वि. श्रीलंका (श्रीलंकेत)
न्यूझीलंड – १ कसोटी वि. भारत (भारतात), ३ कसोटी वि. इंग्लंड (मायदेशात)
द आफ्रिका – १ कसोटी वि. बांगलादेश (बांगलादेशात), २ कसोटी वि. श्रीलंका (मायदेशात), २ कसोटी वि. पाकिस्तान (मायदेशात)
श्रीलंका – २ कसोटी वि. द आफ्रिका (आफ्रिकेत), २ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया (मायदेशात)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community