सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर हैदराबादमधील कैलवरी चर्चच्या (calvary church hyderabad) नावाची चर्चा होऊ लागली आहे. दावा आहे की, दर महिन्याला ३ हजार हिंदूचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केला जाते. तसेच हे कृत्य करणाऱ्या पाद्री सतीश कुमार यांनी असा ही दावा केला आहे की, आतापर्यंत त्यांनी साडेतीन लाख हिंदूंचे धर्मांतर केले आहे. त्यासोबतच भविष्यात ४० नवीन कैलवरी चर्च देशभरात स्थापन करण्याचा त्यांचा डावा आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे करण्यासपासून त्यांना रोखत असल्याचे ही कुमार यांनी सांगितले. (Conversion)
प्रशासनाने चर्चवर घातली बंदी
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काकीनाडचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चर्च बंद करण्यात आले आहे. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यासंदर्भात कोणती तक्रार दाखल झाली आहे का नाही. हे अद्याप कळलेले नाही. परंतु या चर्चच्या मुख्य चर्चसह इतर १० शाखा सुरु आहेत. (Conversion)
वर्ष २०२० मध्ये मिशन काली या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडिओ समोर आला होता. यात सांगण्यात आले होते की, पाद्री सतीश उघडपणे धर्मांतरासारखे शब्द वापरत नाही. मात्र गरिबांना अन्नदान करून गरजूंसह सरकाही यंत्रणांना ही खुश करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, कोविडमध्ये सतीश कुमारने ७०० टन अन्नदान केले होते. (Conversion)
कैलवरी चर्च स्थापना
कैलवरी चर्चची (calvary church hyderabad) स्थापना २००५ मध्ये डॉ. सतीश कुमार यांनी केली. सतीश कुमार यांना लेखक, आतंरराष्ट्रीय वक्ता, पाद्री म्हणून ओळखले जाते. मात्र मिशनरीद्वारे ते करत असलेल्या कार्याची चर्चा होत नाही. ते ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून धर्मांतराचा षडयंत्र राबवत असतात. कैलवरी चर्चचा (calvary church hyderabad) दावा आहे की, चर्चमध्ये ४ लाख सदस्य असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यासाठी ही वाढ फायदेशीर आहे, मात्र दुसरीकडे हिंदूचे धर्मांतर होत असल्यामुळे हिंदू समाजात चिंता पसरलेली आहे. (Conversion)
Join Our WhatsApp Community